नवी दिल्ली – प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यंानी जगभरातील केंद्रीय बँकांना एक सल्ला दिला आहे. ते म्हणाले, जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा एकदा कमी महागाईच्या काळात प्रवेश करू शकते. केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवताना लक्षात ठेवले पाहिजे. शिकागो विद्यापिठात बुथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्रोफेसर राहिलेले राजन म्हणाले , केंद्रीय बँकांनी स्वत:ला विचारले विचारावे की, उच्च चलनवाढीकडून कमी चलनवाढीकडे वाटचाल करत असताना अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी त्यांची धोरणे पुरेशी कडक आहेत का?