विकिमीडिया फाउंडेशनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पाकिस्तानमध्ये विकिपीडिया ब्लॉक केल्याबद्दल माहिती शेअर केली. त्यांनी सांगितले की आम्हाला 1 फेब्रुवारी रोजी एक सूचना मिळाली होती, ज्यामध्ये सामग्री काढून टाकण्यास सांगितले होते.
मराठा समाज आरक्षणाच्या अनुषंगाने शनिवारी सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. अनेक मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
चीनने म्हटले की, हा फुगा रस्ता चुकला आहे. पण अमेरिकेने ते गांभीर्याने घेतले आणि संरक्षण सचिव अँटले ब्लिंकन यांनी चीनचा दौरा रद्द केला. यापूर्वी अमेरिकन संरक्षण विभाग पेंटागॉनचे प्रवक्ते ब्रिगेडियर पॅट रायडर यांनी सांगितले होते की, NORAD (नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड) या गुप्तचर फुग्यावर ब...
रशिया-युक्रेन या दोन देशातील युद्ध आंतराष्ट्रीय स्तरात नवीन समीकरण घडवून गेले. म्हणजेच अमेरिकन डॉलरला टक्कर देत; बलाढ्य देश स्वतःच्या देशातील चलनाचा वापर आंतरराष्ट्रीय व्यवहार करत आहेत. भारत आणि रशियाचे चांगले संबंध अर्थकारणाच्या दृष्टीने अतिशय प्रभावी झाले.
अदानी समूहाची घोडदौड कोणालाही हेवा वाटावी अशीच राहिली आहे. बंदरे,, विमानतळे, ऊर्जा क्षेत्र, पायाभूत प्रकल्प, कृषी, दळणवळण, माध्यमे अशा अनेकविध क्षेत्रांत अदानी समूहाचा दबदबा आहे. मात्र हे सगळे साम्राज्य उभारताना त्यात आर्थिक गैरव्यवहार, अफरातफर, फसवणूक तर केली नाही ना अशी शंका हिंडेनबर्ग अहवालाने...
संत ज्ञानेश्वरांनी निंबाचिया झाडे साखरेचे आळे या ओवीत जसं पेरावं तसं उगवतं, असा संदेश दिला आहे. त्याचबरोह लिंबाच्या झाडांना साखरेचं आळं घातलं, तरी त्याचा कडूपणाचा गुणधर्म लिंब सोडत नाही, असं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे. पाकिस्तानचंही लिंबाच्या झाडासारखंच आहे.
कसबा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामध्ये भाजप, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), राष्ट्रवादी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह विविध इतर पक्ष आणि अपक्षांनी अर्ज नेले आहेत.
म्हाडा सोडतीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मंगळवारी (३१ जानेवारी) घेण्यात आला होता. म्हाडाच्या पुणे मंडळाने शुक्रवारी घरांसाठी अर्ज करण्याला मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले. म्हाडाच्या विविध योजनेतील २५९४ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २९९० सदनिका आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३९...
ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहेत.
दर चार-पाच दिवसात याठिकाणी एकदातरी किरकोळ किंवा रक्त निघेपर्यंत आमच्या सोसायटीच्या मुख्य रस्त्यावर क्लासेसच्या मुलांची भांडणे होतात. अतिशय घाणेरड्या शिव्या आणि ठार मारण्याची, खून करण्याची भाषा ही मुले करतात. डोक्यात दगड मारून ठार मारण्याची धमकी देतात. विशेष म्हणजे हे सर्व मुलींच्या आणि शिक्षकांसम...
महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे महानगरपालिकेचा 2023-24 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी शनिवार 4 फेब्रुवारीला पहिल्यांदाच प्रशासक व पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे सादर केला. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावेळी अर्थसंकल्पाचे आकारमान 7 हजार कोटी...
"महाराष्ट्राचे 13 खासदार आणि 40 आमदार ज्यांनी गद्दारी केली आहे. त्यांना आज मी चॅलेंज देतोय. तुम्ही तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून कसे येता, ते दाखवाच. मी तर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंज दिलंय.
दिंडोशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी जीवन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथक मुंबईत आले होते. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, दिंडोशीच्या हद्दीत बनावट नाण्यांचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.