चेन्नई हादरली! चर्चमधून परतत असताना विद्यापीठ परिसरात विद्यार्थिनीवर अत्याचार
तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बुधवारी सकाळी अण्णा विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीव अत्याचार करण्यात आला. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 37 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आरोपीचं नाव ज्ञानशेखरन असून तो बिर्याणी विक्रेता आहे. पहाटे पीडित मुलगी आणि तिचा मित्र जवळच्या चर्चमध्ये प्रार्थना करून विद्यापीठ कॅम्पसमध्ये परतत असताना हा प्रसंग घडला.
बर्थडे पार्टीला बोलावून विवस्त्र करून मारहाण, मग लघवी पाजली अन्…; अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या
ग्रेटर चेन्नई पोलिसांनी (GCP) बुधवार, 25 डिसेंबर रोजी अण्णा विद्यापीठ लैंगिक अत्याचार प्रकरणी गुणशेखरन (37) नावाच्या एका व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की गुणशेखरन या बिर्याणी विक्रेत्याला पुराव्यांसह अटक करण्यात आली असून त्याने यासंदर्भात कबुलीही दिली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने 23 डिसेंबर रोजी अण्णा युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये एक तरुणी आणि तिच्या मित्राचे चित्रीकरण केले होते. पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की तिच्या मित्रावर हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर त्या व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याचं आरोपींनी चित्रीकरण देखील केलं होतं, ज्यांनी नंतर त्याचा वापर पीडितेला धमकावण्यासाठी केला होता.
भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 64 (बलात्काराची शिक्षा) अंतर्गत 24 डिसेंबर रोजी राजा अन्नामलाई पुरमच्या सर्व महिला पोलीस स्टेशन (AWPS) मध्ये पोहोचल्यानंतर पीडितेची तक्रार दाखल करून घेण्यात आली. या घटनेनंतर अण्णा विद्यापीठाने कॅम्पसमध्ये अतिरिक्त सुरक्षा ठेवण्याचे आश्वासन दिलं आहे. सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा करण्यासाठी पोलीस आणि विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांसह एक संयुक्त सुरक्षा आढावा बैठक देखील घेणार असल्याचं सांगितलं.
वाराणसीमध्ये सकाळी एका मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शाळेच्या आत मृतदेह सापडला असून मुलगी एक दिवशी आधी संध्याकाळी बेपत्ता होती. हे प्रकरण रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुजाबादचे आहे. येथील रहिवासी असलेल्या ८ वर्षीय मुलीचा मृतदेह बुधवारी सकाळी बहादूरपूर येथील प्राथमिक शाळेत गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा संशय आहे. रामनगर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून घटनेचा तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
माहिती देताना अपंग वडिलांनी पोलिसांना सांगितले की, मुलगी मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास समाधीजवळील दुकानातून सामान आणण्यासाठी घरातून निघाली होती. ती मच्छरचं कॉइल घेण्यासाठी बाहेर गेली होती.
उशिरापर्यंत मुलगी घरी न परतल्याने तिचा शोध सुरू होता. ही माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यावेळी पोलिसांना ती बेपत्ता असल्याचे सांगण्यात आलं. मंगळवारी सायंकाळपासून मुलीचा शोध सुरू होता. बुधवारी सकाळी बहादूरपूर गावातील प्राथमिक शाळेच्या आवारात एका गोणीत त्यांचा मृतदेह आढळून आला.