Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajmer Dargah: शिवमंदिराच्या जागेवर अजमेर दर्गा? कोर्टाने हिंदू सेनेची याचिका स्वीकारली; पक्षकारांना नोटिस

Ajmer News: दर्ग्याच्या ठिकाणी शिवमंदिर असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर मुस्लिम समाजाने देखील आपली प्रतिक्रिया दिल्याचे म्हटले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 28, 2024 | 04:25 PM
Ajmer Dargah: शिवमंदिराच्या जागेवर अजमेर दर्गा? कोर्टाने हिंदू सेनेची याचिका स्वीकारली; पक्षकारांना नोटिस

Ajmer Dargah: शिवमंदिराच्या जागेवर अजमेर दर्गा? कोर्टाने हिंदू सेनेची याचिका स्वीकारली; पक्षकारांना नोटिस

Follow Us
Close
Follow Us:

अजमेर: राजस्थानमधील अजमेर दर्ग्याबाबत एक मोठा दावा करण्यात आला आहे. या ठिकाणी शिवमंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान अजमेर दर्ग्याच्या ठिकाणी शिवमंदिर असल्याचा दावा करणारी एक याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. कोर्टाने ही याचिका स्वीकारली आहे. अजमेर दर्ग्याच्या ठिकाणी शिवमंदिर असल्याची याचिका स्वीकारल्यानंतर कोर्टाने सर्व पक्षकरांना नोटिस देखील बजावली आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे.

दर्ग्याच्या ठिकाणी शिवमंदिर असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर मुस्लिम समाजाने देखील आपली प्रतिक्रिया दिल्याचे म्हटले जात आहे. ऑल इंडिया सूफी सज्जादानशिन कौन्सिलचे अध्यक्ष आणि ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तिचे वंशज नसीरुद्दीन चिश्ति यांनी या प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. देशभरात अनेक ठिकाणी मशिदीच्या ठिकाणी मंदिर असल्याचे दावे केले जात असल्याचे ते म्हणाले. याबाबत आम्ही कायदेशीर पावले उचलणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

अजमेर दर्ग्याबाबत हिंदू सेनेकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. हिंदू सेनेच्या अध्यक्षांनी ही याचिका दाखल केली आहे. कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करताना ही याचिका स्वीकारली आहे. यावर 20 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. कोर्टाने दर्गा कमिटी आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभगाला नोटिस बजावली आहे. 20 तारखेला कोर्टात उपस्थित राहण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.  अजमेर दर्ग्याच्या ठिकाणी या आधी भगवान श्री संकटमोचन महादेवाचे मंदिर होते असे या याचिकेत सांगण्यात आले आहे. दरम्यान आता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता यावरून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

संभलमध्ये हिंसाचार

उत्तरप्रदेश राज्यातील संभळ शहरात मशि‍दीवरुन हिंसाचार उफाळला आहे. या भागातील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या चकमकीत चार जणांचा मृत्यू तर 22 हून अधिक पोलिस जखमी झाले होते. याचदरम्यान विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपावर आरोप केले आहेत आणि द्वेषाचे राजकारण म्हणून याचा उल्लेख केला आहे. पण नेमकं संभळ शहरात काय घडलं आहे?

हेही वाचा: Sambhal Violence: हरिहर मंदिर की जामा मशीद? उत्तरप्रदेशातील संभलमध्ये हिंसाचारात चार तरुणांचा मृत्यू, प्रकरण काय?

संभळची शाही जामा मशीद हरिहर मंदिर असल्याबाबत दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे सर्वेक्षणाचे आदेश दिल्यानंतर रविवारी (२४ नोव्हेंबर) न्यायालय आयुक्तांचे पथक मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी आले असता संभळमध्ये एकच गोंधळ उडाला. हा गोंधळ इतका वाढला की संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आणि वाहनेही पेटवली. या काळात हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक पोलीस जखमी झाल्याचे वृत्त समोर आले होते.  ज्येष्ठ वकील विष्णू शंकर जैन यांनी मंगळवारी (19 नोव्हेंबर) संभळच्या शाही जामा मशिदीला हरिहर मंदिर म्हणून संबोधत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात याचिका दाखल केली आणि न्यायालयाने मुस्लिमांचे ऐकून न घेता अडीच तास सुनावणी केली. सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने सात दिवसांची मुदत दिली आहे.

 

Web Title: Court accepted hindu sena petition ajmer dargah on the site of shiv temple rajasthan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 02:42 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.