सोशल मीडियामुळे आपल्याला आपले विचार मांडण्याची संधी मिळते. पण अनेकदा असे दिसून येते की काही लोक अशा पोस्ट करतात ज्यामुळे इतरांच्या भावना दुखावतात. गुजरातमधील वलसाड येथून असेच एक प्रकरण समोर आले आहे. मुस्लिम समाजातील एका व्यक्तीने फेसबुकवर हिंदू भगवान गणेशाचा फोटो पोस्ट केला. या फोटोसोबच त्याने गणपतीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी (Muslim man for making fun of lord ganesha ) केली होती. आता या व्यक्तिला न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. नेमंक काय आहे प्रकरण जाणुन घ्या.
[read_also content=”‘महादेव अॅप’ प्रकरणी चौकशासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन! https://www.navarashtra.com/india/mumbai-police-special-team-will-be-investigate-mahadev-app-case-nrps-483640.html”]
रिपोर्टनुसार, 2018 साली गुजरातमधील वलसाड येथेली ३४ वर्षीय आझाद रियाजुद्दीन अन्सारने फेसबुकवर गणेशाचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोसह त्याने आक्षेपार्ह आणि अश्लील कमेंट केली होती. त्यांच्या पोस्टला अनेकांनी विरोध केला. हिंदू संघटनांचे काही लोकांनी त्याला चपलांचा हार घातला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. आता आझाद अन्सारी याला न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. आता त्याला तीन वर्षे तुरुंगात जावे लागणार आहे. याशिवाय त्याला पन्नास हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ‘देश गुजरात’च्या वृत्तानुसार त्याला अतिरिक्त न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
आझाद अन्सारी यांच्यावर गणपतीबद्दल असभ्य संदेश पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2018 मध्ये घडलेल्या या घटनेसाठी न्यायालयाने नोव्हेंबर 2023 मध्ये शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय त्याच्यावर दंडही ठोठावण्यात आला आहे.