
नालिया : बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biporjoy Cyclone) धोका आणखी वाढत चालला आहे. गुरुवारी सायंकाळी 4 ते रात्री 8 वाजताच्या दरम्यान हे चक्रीवादळ सौराष्ट्र, कच्छ जखाऊ पोर्ट आणि पाकिस्तानला धडकण्याची शक्यता आहे. यासोबतच कच्छ, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट आणि मोरबी जिल्ह्यात हवेची गतीही 125 ते 145 किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे.
गुजरातमधील 8 जिल्ह्यांना अलर्ट जारी केला असून, 9 राज्यांतही या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार आहे. चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता प्रशासन सज्ज झाले असून, एसडीआरएफ, एनडीआरएफ, कोस्टगार्डसह लष्करही तैनात करण्यात आले आहे. चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकण्यापूर्वी गुजरात-महाराष्ट्राच्या किनारी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे.
9 राज्यांमध्ये प्रभाव
देशातील 9 राज्यांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येत आहे. गुजरातमधील आठ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, कोस्ट गार्ड व्यतिरिक्त मदत आणि बचावासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. 3.5 गुजरातमधील 7 जिल्ह्यांमधून 47 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे रेल्वेच्या कामकाजावर झाला आहे. वादळाच्या इशाऱ्यामुळे पश्चिम रेल्वेने सुमारे 95 रेल्वे ट्रेन रद्द केल्या आहेत. त्याचसोबत काही ट्रेन शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत.