नवी दिल्ली : भारतीय महिला कुस्तीपटूंनी आपल्यावर लैगिंक शोषण झाले असं म्हणत मागील काही दिवसांपासून दिल्लीत आंदोलनाला बसले आहेत. दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या अटकेच्या मागणीविरोधात कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आघाडी उघडणाऱ्या कुस्तीपटूंच्या बाजूने उतरल्या आहेत. सीएम ममता यांच्या पक्ष तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ कोलकात्याच्या रस्त्यावर पायी मोर्चा काढला. यात ममता बॅनर्जीही सहभागी झाल्या होत्या. या मोर्चामुळे कुस्तीपटूंसाठी रस्त्यावर मोर्चा काढणाऱ्या ममता पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत.
खापने बोलावली महापंचायत
दरम्यान, कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकेत यांनी आज (1 जून) खाप महापंचायत बोलावली आहे. ही महापंचायत उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये आयोजित केली जाणार आहे. त्यात दिल्ली, यूपी, हरियाणा आणि पंजाब, राजस्थानसह देशभरातील विविध खापचे प्रतिनिधी असतील. खाप आणि शेतकरी गटांचे प्रतिनिधी या महापंचायतीमध्ये कुस्तीपटूंच्या सुरु असलेल्या आंदोलनावर चर्चा करतील.