jet airways
मुंबई: गेली तीन वर्षे जेट एअरवेजच्या विमानांची उड्डाणे बंद होती. कंपनीवर कर्जाचे ओझे होते. (Jet Airways Airline) मात्र आता जेट एअरवेजच्या विमानांच्या उड्डाणांचा मार्ग मोकळा झाला आहे. हवाई वाहतूक संचालनालय अर्थात डीजीसीएने (DGCA) परवानगी जेट एअरवेजला उड्डाणासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे जेटची विमानसेवा आता पुर्ववत होणार आहे.
[read_also content=”शरद पवार आणि संजय राऊतांवर देवेंद्र फडणवीसांनी साधला निशाणा, म्हणाले…. https://www.navarashtra.com/latest-news/devendra-fadnavis-statement-about-sharad-pawar-and-sanjay-raut-nrsr-282544.html”]
वाढत्या तोट्यामुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजला पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. कंपनीचे नवे मालक मुरारी लाल जलान यांनी कंपनी विकत घेतल्यानंतर हवाई वाहतूक संचालनालयाकडून सर्व परवानग्या घेऊन आता कंपनी लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु होणार आहे. गेल्या महिनाभरापासून सराव उड्डाणे सुरु होती. दरम्यान १५ आणि १७ मे रोजी प्रोव्हाईडिंग फ्लाईट्सही कंपनीकडून उडवण्यात आल्या. ज्यात हवाई वाहतूक संचालनालयाचे अधिकारी होते. त्यांच्या पर्यवेक्षणानंतर आता एअर ऑपरेटर सर्टीफिकेट (Air Operator Certificate) कंपनीला देण्यात आले आहे. ज्यामुळे आता कंपनी विमानसेवा सुरु करणार आहे.
कंपनीचे नवे मालक मुरारी लाल जलान (Murari Lal Jalan) म्हणाले की, “ही बातमी केवळ जेट एअरवेजसाठी नवी सकाळ नसून संपूर्ण भारतीय विमानसेवेसाठी एक मोठी गोष्ट आहे. आम्ही भारताची एक लाडकी विमानसेवा पुन्हा सर्वांसाठी घेऊन येत आहोत. आम्ही सर्व ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असून नवनवीन सेवा पुरवण्यासाठीही प्रयत्न करु.”