मुंबई : फेसबुक, गुगल आणि इंस्टाग्रामने देशात आक्षेपार्ह मजकुराविरोधात कडक कारवाई केली आहे. सोशल मीडिया कंपनी मेटाने म्हटले आहे की डिसेंबरमध्ये फेसबुकने १३ श्रेणींमध्ये १३. ९३ दशलक्षाहून अधिक आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकल्या आहेत. कंपनीच्या मासिक अनुपालन अहवालात असे म्हटले आहे की फोटो-शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरून १२ श्रेणींमधील २. ४ दशलक्ष कन्टेन्ट काढून टाकण्यात आले आहे.
फेसबुकला भारतीय तक्रार प्रणालीद्वारे ५३१ तक्रारी प्राप्त झाल्या माहिती तंत्रज्ञान (IT) नियमांनुसार, मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मने (ज्याचे ५ दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत) दरमहा अनुपालन अहवाल प्रकाशित करणे आवश्यक आहे.
या अहवालात आक्षेपार्ह मजकुराबाबत आलेल्या तक्रारी आणि त्यावर केलेली कारवाई यांचा तपशील आहे. या अहवालात स्वयंचलित देखरेखीद्वारे आक्षेपार्ह सामग्री काढल्याचा तपशीलही आहे. अहवालानुसार, डिसेंबरमध्ये फेसबुकला भारतीय तक्रार प्रणालीद्वारे ५३१ तक्रारी प्राप्त झाल्या.
गुगलने डिसेंबरमध्ये ९४,१७३ आक्षेपार्ह मजकूर काढून टाकला
डिसेंबरमध्ये, गुगलला कॉपीराइट उल्लंघनासह आक्षेपार्ह सामग्रीबद्दल वापरकर्त्यांकडून ३१,४९७ तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींच्या आधारे गुगलने ९४,१७३ आक्षेपार्ह मजकूर काढून टाकला. याशिवाय, स्वयंचलित देखरेखीद्वारे डिसेंबरमध्ये ४,०५,९११ सामग्री देखील काढण्यात आली.
अहवालात म्हटले आहे की डिसेंबर महिन्यात भारतातील वैयक्तिक वापरकर्त्यांकडून ३१,४९७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींनंतर कारवाई करत, कंपनीने विविध श्रेणींमध्ये ९४,१७३ आक्षेपार्ह कन्टेन्टवर कारवाई केली, ज्यात कॉपीराइट उल्लंघनासाठी ९३,६९३ सामग्रीचा समावेश आहे.
फेक न्यूज रोखण्यासाठी फेसबुक पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय झाले आहे. कोणत्याही आक्षेपार्ह पोस्टची तक्रार केल्यानंतर फेसबुक योग्य ती कारवाई करते. यापूर्वी सोशल मीडिया कंपनी मेटाने नोव्हेंबरमध्ये भारतात फेसबुकवर १६२ दशलक्षाहून अधिक कन्टेन्टवर कारवाई केली होती. फेसबुकने १३ श्रेणींमध्ये ही कारवाई केली. कंपनीच्या मासिक अनुपालन अहवालानुसार, फेसबुकच्या फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने नोव्हेंबरमध्ये १२ श्रेणींमध्ये ३. २ दशलक्षाहून अधिक सामग्रीवर कारवाई केली.