उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव ((Mulayam Singh Yadav) यांनी वयाच्या 82 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानतंर देशातील राजकीय वर्तुळातुन प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी शोक व्यक्त केला.
[read_also content=”काश्मीर हा आमचा द्विपक्षीय मुद्दा, भारताने पाकिस्तान-जर्मनीला ठणकावले https://www.navarashtra.com/india/indian-arindam-bagchi-on-pakistan-and-germany-over-ind-pak-kashmir-issue-334378.html”]
मुलायमसिंह यादव हे देशाच्या आणि विशेषतः उत्तर प्रदेश राज्याच्या राजकारणातील एक धुरंधर नेते होते. व्यापक जनसंपर्क आणि संघटन कौशल्यामुळे त्यांची राजकारणावरील पकड कायम राहिली. उत्तम संसदपटू असलेल्या मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून उत्तम काम केले होते. आपण उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य होण्यापूर्वीपासूनच आपला मुलायमसिंह यादव यांचेशी घनिष्ट परिचय होता. सर्व पक्षातील लोकांशी त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक मोठा अध्याय संपला आहे. दिवंगत मुलायमसिंह यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना श्री अखिलेश यादव तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.
[read_also content=”जागतिक मंदीची चिन्हे? Facebook च्या 12000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कधीही जाण्याची शक्यता https://www.navarashtra.com/world/signs-of-a-global-recession-12000-facebook-employees-may-lose-their-jobs-at-any-time-nrrd-334423.html”]
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.आज सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.