Haryana Election Results 2024 : हरियाणातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यास झालेल्या विलंबाबाबत काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोग जाणूनबुजून डेटा संथ गतीने अपडेट करत आहे, ज्यामुळे निकालांची पारदर्शकता धोक्यात येत असल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला आहेत. तसेच, जप प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याची भीती व्यक्त होत आहे.” असंही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
काँग्रेसच्या या आरोपावर निवडणूक आयोगाने उत्तर देत काँग्रेसचे हे सर्व आरोप तथ्यहीन आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, ‘लोकसभा निवडणुकीचे निकाल येणार होते त्या दिवशी 4 जानेवारी 2024 रोजीही काँग्रेसने असेच आरोप केले होते. आयोगाला हे आरोप निराधार आणि खोटे आणि निराधार आहेत. निवडणूक आचार नियमांच्या नियम 60 अन्वये पूर्वनिर्धारित मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी होते, असे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. आयोगाने नियुक्त केलेले अधिकारी मतमोजणीवर सतत लक्ष ठेवतात.
दरम्यान, हरियाणा निवडणुकीच्या आत्तापर्यंतच्या ट्रेंडमध्ये भाजपला सतत आघाडी मिळताना दिसत आहे. भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय INLD दोन आणि इतर पाच जागांवर पुढे आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार, भाजप 50 जागांवर आघाडीवर आहे आणि जर या ट्रेंडचे परिणामांमध्ये रूपांतर झाले, तर राज्याच्या निवडणूक इतिहासातील ही पक्षाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असेल.