Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haryana Election Results 2024: हरयाणातील विजयामागे कशी होती भाजपची रणनीती?

हरयाणा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या रणनीतीत थोडासा बदल करून किसान सन्मान निधीची रक्कम 6 रुपयांवरून 10 रुपये करण्याची घोषणा केली. तसेच, अग्निवीर योजनेबाबत भाजपने हरयाणातील प्रत्येक अग्निवीराला कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कायमस्वरूपी नोकरी मिळते, मग भाजपवर नाराज कशाला, असा संदेश जनतेत गेला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 08, 2024 | 04:42 PM
Haryana Election Results 2024: हरयाणातील विजयामागे कशी होती भाजपची रणनीती?
Follow Us
Close
Follow Us:

हरयाणा:   हरयाणाचा विधानसभा निवडणुकांचा निकाल जवळपास स्पष्ट होऊ लागला आहे. हरयाणाच्या जनतेने त्यांची मते  भाजपच्या पारड्यात टाकली आहेत. आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालानुसार, भाजप 49 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. पण हरयाणाचे हे निकाल धक्कादायक नाही.  भाजपचे राजकारण आणि रणनीती बारकाईने जाणून घेतल्यास हरियाणाचा निकालही तशाच पद्धतीने लागला आहे.

काँग्रेसने निवडणुकीत शेतकरी, सैनिक आणि पैलवानांचा मुद्दा बराच उचलून धरला. विशेषत: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसने भाजपला चांगलेच धारेवर धरले होते.  आणि हरयाणात काँग्रेसचे सरकार आल्यास शंभू सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी दिल्लीला जाण्यासाठी हरयाणाच्या सीमा खुल्या केल्या जातील, असेही सांगितले. विशेषत: जाट समाजाला भाजपमधून बाहेर काढण्यासाठी बरीच रणनीती आखण्यात आली.

एकप्रकारे हरयाणातील शेतकरी भाजपवर नाराज असून, यावेळी शेतकरी भाजपला धडा शिकवतील, असे दाखवण्याचा  काँग्रेसकडून मोठा प्रयत्न करण्यात आला. मात्र आता ज्या पद्धतीने निकाल येत आहेत, त्यावरून असे दिसते की, शेतकरी संतप्त होते, तर ते कसे मान्य झाले आणि भाजपने कोणती रणनीती अवलंबली, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा : भाजपने उमेदवारी नाकारली, अपक्ष लढल्या; देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल

शेतकरी खरच नाराज होते का?

हरयाणा निवडणुकीतील दुसरा सर्वात मोठा मुद्दा ‘जवान’ होता, काँग्रेसने थेट अग्निवीरशी जोडला होता, कारण लष्करातील सुमारे 10 टक्के सैनिक हरयाणातील आहेत. तर हरयाणाची लोकसंख्या 3 कोटींच्या आसपास आहे. एवढेच नाही तर शेतकरी आणि सैनिकांचा प्रश्न हरयाणातील प्रत्येक घराशी संबंधित आहे. केंद्र सरकारची ‘अग्नवीर योजना’ ही सैनिकांचा सर्वात मोठा विश्वासघात असल्याचे काँग्रेसने म्हटले होते.  मात्र, लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने देशभरात हेच मुद्दे मांडले होते. हरियाणात भाजप-काँग्रेसने लोकसभेच्या 5-5  जागा जिंकल्या होत्या.

सैनिक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त हरयाणातच सर्वाधिक ठळक होते. शेतकऱ्यांचा प्रश्न पंजाबमध्येही आहे. मात्र तेथे भाजप शर्यतीत नाही. अशा स्थितीत हरयाणात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे.  तर सैनिक आणि शेतकऱ्यांबद्दल जी नाराजी बोलली जाते ती वास्तवात नाही, हेही सिद्ध होणार आहे. .

तसंच हरियाणाच्या जटलँडमध्ये भाजपला ज्या प्रकारे यश मिळतंय, ते पाहता शेतकरी आणि सैनिकांचा मुद्दा कुठे आहे, असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. मग भविष्यात काँग्रेस हे मुद्दे मांडण्याच्या स्थितीत असेल का? या निवडणुकीच्या निकालावरून हेही स्पष्ट होईल की, ‘अग्नीवीर योजने’बाबत विरोधक जे कथन मांडत होते त्याचा जमिनीवर काहीही परिणाम होत नाही. हरियाणातील जनतेने अग्निवीर योजनेला योग्य मानले तर विरोधकांना हा मुद्दा उपस्थित करणे सोपे जाणार नाही.

हेही वाचा :  Haryana Elelction 2024 updates: जयराम रमेश यांच्या आरोपांना निवडणूक आयोगाचे उत्तर

अग्निवीर योजनेची स्वीकृती वाढली

हरयाणा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या रणनीतीत थोडासा बदल करून किसान सन्मान निधीची रक्कम 6 रुपयांवरून 10 रुपये करण्याची घोषणा केली. तसेच, अग्निवीर योजनेबाबत भाजपने हरयाणातील प्रत्येक अग्निवीराला कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कायमस्वरूपी नोकरी मिळते, मग भाजपवर नाराज कशाला, असा संदेश जनतेत गेला.

अशा स्थितीत अग्निवीर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपला जनतेचा पाठिंबा मिळाला असून, त्याचे भांडवल आता देशातील अन्य राज्यांमध्येही भाजप करेल, असे म्हणता येऊ शकते.  यासोबतच अग्निवीर योजनेची मान्यताही वाढली असून, ज्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत, त्या मागण्यांचाही विचार करावा लागणार आहे.

हरियाणात हॅटट्रिक…भाजपसाठी बूस्टर डोस

लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा निवडणूक ही भाजपसाठी लिटमस टेस्ट होती. या चाचणीत भाजपला जोरदार यश मिळाले असून, आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका होणार आहेत. जिथे हरियाणा निवडणुकीचा स्पष्ट संदेश जाईल की शेतकरी आणि सैनिक भाजपसोबत आहेत. हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करत असेल तर तो इतिहासच आहे. त्याचवेळी शेतकरी, सैनिक आणि पैलवानांचा प्रश्न जमिनीवर नसल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपसाठीही हा मोठा दिलासा आहे.

Web Title: Haryana election results 2024 what was the victory strategy of bjp in haryana nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 04:42 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.