(फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
बनावट मेसेज आणि फोन करून लोकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. खोटा फोन आणि मेसेज पाठवून लोकांकडून पैसे उकळणे, लोकांची फसवणूक करणे, अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच एक घटना काल देखील घडली. काल संपूर्ण देशभरातील लोकांच्या फोनवर एक मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये म्हटले होते की, ‘प्रिय ग्राहक, आज रात्री ९.३० वाजता तुमच्या घराची वीज कापली जाणार आहे.’ या मेसेजमुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. नागरिकांनी या प्रकरणी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर चौकशी केली असता, हा मेसेज बनावट असल्याचे आढळले. या प्रकरणी तपास करून बनावट मेसेज पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल देशभरातील लोकांच्या फोनवर एक मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये म्हटले होते की, ‘प्रिय ग्राहक, आज रात्री ९.३० वाजता तुमच्या घराची वीज कापली जाणार आहे. लवकरात लवकर आमच्या विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.’ या मेसेजमुळे ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणी चौकशी आणि तपास केल्यानंतर हा मेसेज बनावचट असल्याचे समजले. लोकांची फवसणूक करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये दहशत पसरवण्यासाठी हा मेसेज पाठविण्यात आला होता. हा मेसेज बनावट असून नागरिकांनी ह्या मेसेजवर विश्वास ठेऊ नये. हे प्रकरण सायबर सेलकडे सोपविण्यात आले असून सायबर सेलचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या मेसेज कोणी आणि कुठुन पाठवला होता, याचा तपास सुरु आहे. हा बनावट मेसेज पाठवणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
नागरिकांनी अशाप्रकारच्या कोणत्याही बनावट मेसेजवर विश्वास ठेऊ नये. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी केवळ अधिकृत सूचनांवर अवलंबून राहावे. अशा प्रकारचा कोणताही संदेश मिळाल्यास तातडीने वीज विभागाच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा आणि बनावट मेसेजबद्दल माहिती द्यावा. नागरिकांनी सहकार्य केल्यास बनावट मेसेज पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यास मदत होईल, असे आवाहन वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.