water in tajmahal agra rain update
आग्रा : सध्या दिल्ली आणि आग्रा या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मागील तीन दिवसांपासून आग्रा शहराला तुफान पावसाने झोडपले आहे. यामुळे वारसास्थळ आणि जगातील आठ आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहाल देखील याचा फटका बसला आहे. पावसामुळे ताजमहाल परिसरामध्ये पाणीच पाणी साचले आहे. आता ताजमहालमधील तीन घुमटांपैकी मुख्य घुमटामधून पाणीगळती होत आहे. याची माहिती भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोशल मीडियावर देखील याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावर मागील दोन दिवसांपासून ताजमहालचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ताजमहाल समोरील उद्यानामध्ये पाणीच पाणी साचले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे म्हणत अधिकची माहिती दिली आहे. आग्रा विभागाच्या पुरातत्व खात्यामधील अधीक्षक प्रमुख राजकुमार पाटील यांनी पीटीआयशी सांगितले, “ताजमहालमध्ये पाण्याची गळती होत असल्याची बातमी खरी आहे. आम्ही मुख्य घुमटाची तपासणी केली असून पावसामुळे ही गळती होत असल्याचे दिसून आले. तसेच ड्रोन कॅमेऱ्याने आम्ही घुमटाची तपासणी केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
🚨🇮🇳 | The symbol of love, Taj Mahal, is flooded. The garden situated in the premises of this beautiful building is submerged. It has been raining continuously for the last 24 hours in Agra. Efforts are on to drain out the water.
📌 #Agra | #UttarPradesh | #india#tajmahal… https://t.co/V3YoVyg79y pic.twitter.com/iMTMWxdPv6— Weather monitor (@Weathermonitors) September 12, 2024
आग्रामध्ये मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच येथील नागिरकांचा व्यवसाय ताजमहाल संबंधित पर्यटनावर आधारित आहे. ताजमहालच्या बागेमध्ये पाणी साचल्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. पावसामुळे येथील राष्ट्रीय महामार्ग जलमय झाला आहे, काही भागातील शेतात तळे साचले असून पिके वाया गेली आहेत तर शहरी भागातही पाणी साचले आहे.