गडचिरोलीमध्ये पावसाचा कहर
अहमदाबाद : गुजरातमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्त भागातून तब्बल 17,800 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर पावसात अडकलेल्या दोन हजार जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस पडत आहे.
हेदेखील वाचा : उघडीप दिलेला पाऊस गडचिरोलीत चांगलाच बरसणार; पुढील चार दिवस…
राजकोट, मोरबी, आनंद, देवभूमी द्वारका आणि वडोदरा येथे मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराच्या प्रत्येकी पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यातील 137 जलाशय, तलाव आणि 24 नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत असून, सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक आणि रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेससह आठ गाड्या रद्द करण्यात आल्या असून, इतर 10 गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या सर्व परिस्थितीवरून एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य करत आहेत. राज्याच्या विविध भागात पावसामुळे भिंत कोसळून बुडून मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये एकूण 35 जणांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान मोदींचा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन
गुजरातमध्ये झालेल्या पूरसदृश परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला. या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
जनजीवन विस्कळीत
गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पुरामुळे आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. पाऊस आणि पुराचा तडाखा बसलेल्या गुजरातला लवकरच दिलासा मिळण्याची आशा नसल्याचे सध्याच्या वातावरणातून दिसून येत आहे. हवामान खात्याने 30 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
गुजरातमधील 18 जिल्हे पुराच्या विळख्यात
गुजरातमधील 18 जिल्हे पुराच्या विळख्यात आहेत. पूरग्रस्त भागातून 8,400 लोकांना वाचवण्यात आले आणि त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
हेदेखील वाचा : नागपूरकरांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी ! विजांच्या कडकडाटासह आज पावसाची शक्यता