himachal mountaineer baljit kaur found alive will be airlifted by three helicopters see the details here nrvb
शिमला : नेपाळमधील (Nepal) अन्नपूर्णा पर्वतावरील (Annapurna Mountain) बेस कॅम्प-4 (Base Camp-4) जवळ बेपत्ता (Missing) झालेली गिर्यारोहक (Mountaineer) बलजीत कौर जिवंत सापडली आहे (Baljit Kaur Alive). नेपाळी मीडियानुसार, बचाव पथक बलजीत कौरच्या संपर्कात आहे. बलजीतला शोधण्यासाठी तीन हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. तिला एअरलिफ्ट करण्याची तयारी सुरू आहे. ऑक्सिजन मास्क न वापरता काल जगातील दहावे सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या बलजीत कौरचा हवाई पथकाने शोध घेतला, असे पायोनियर ॲडव्हेंचर पासांग शेर्पाच्या अध्यक्षांनी सांगितले.
हिमाचलच्या सोलन जिल्ह्यातील बलजीत कौर अन्नपूर्णा शिखरावर चढाई करत होती. शेर्पाच्या म्हणण्यानुसार, हवाई शोध पथकाने बलजीतला कॅम्प 4 च्या दिशेने एकटी उतरताना पाहिले. शिखर बिंदूच्या खाली एकटी राहिलेली विक्रमी भारतीय महिला गिर्यारोहक आज सकाळपर्यंत रेडिओ संपर्कापासून दूर होती. तिला ‘तातडीच्या मदतीसाठी’ रेडिओ सिग्नल पाठवण्यात यश आल्यानंतर आज सकाळी हवाई शोध मोहीम सुरू करण्यात आली. शेर्पांच्या मते, तिच्या GPS स्थानाने 7,375 मीटर (24,193 फूट) उंची दर्शविली. तिने दोन शेर्पा मार्गदर्शकांसह काल संध्याकाळी 5:15 च्या सुमारास अन्नपूर्णा पर्वतावर चढाई केली होती.
[read_also content=”निर्भयासारखीच अंगावर काटा आणणारी घटना, पोट आणि छातीवर दिले सिगारेटचे चटके; गुप्तांगावरही आढळल्या हल्ल्याच्या खुणा, वाचा कुठे आणि कशी घडलीये घटना https://www.navarashtra.com/crime/cruelty-like-nirbhaya-incident-rape-case-with-girl-in-fatehpur-cigarette-burns-stomach-and-chest-nrvb-386816.html”]
गिर्यारोहक बलजीत कौर हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तिचे घर कांदाघाटातील पांजरोळ गावात आहे. बलजीत कौरचे वडील अमर सिंग हिमाचल रोड ट्रान्सपोर्टमध्ये बस ड्रायव्हर होते. आता ते निवृत्त झाले आहेत. बलजीतची आई शांती देवी गृहिणी आहे. बलजीत कौर यांना एकूण तीन भावंडं आहेत.
बलजीतने आपल्या करिअरची सुरुवात मनालीतील देव टिब्बावर चढाई करून केली. त्यावेळी बलजीत अवघी १९ वर्षांची होती. 8000 मीटर उंचीची पाच शिखरे 30 दिवसांत सतत जिंकण्याची कामगिरी बलजीत कौर हीच्या नावावर आहे. यामध्ये अन्नपूर्णा, कंचनजंगा, एव्हरेस्ट, ल्होत्से आणि मकालू शिखरांचा समावेश आहे.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 18 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-18-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवत बलजीतने अल्पावधीतच एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑक्सिजन मास्कशिवाय मानसर पर्वतावर चढाई करणाऱ्या बलजीत कौरचे ऑक्सिजन मास्कशिवाय माउंट एव्हरेस्ट जिंकण्याचे स्वप्न आहे.