Pradnya Thakur on Love Jihad News:
Pradnya Thakur on Love Jihad News: देशात अलीकडे लव्ह जिहादचा मुद्दा चांगलाच तापला आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणांमुळे राजकीय वर्तुळातही हालचाली सुरू असतात. अशातच माजी खासदार आणि वादग्रस्त भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी अलीकडेच मुलींचे संगोपन आणि ‘लव्ह जिहाद’ बाबत एक विधान वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘If a girl doesn’t listen, break her legs..’; Pragya Thakur’s controversial statement on love jihad
“जर एखादी मुलगी तिच्या पालकांचे म्हणणे ऐकत नसेल आणि दुसऱ्या धर्माच्या पुरुषाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल तर कुटुंबाने तिला थांबवण्यासाठी आणि तिला योग्य मार्गावर परत आणण्यासाठी. ठाम भूमिका घेतली पाहिजे. जर गरज पडली तर तिचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी तिला फटकारून दाखवा. जर एखादी मुलगी ऐकण्यास नकार देत असेल तर तिचे पाय तोडून टाका. जर तुम्हाला तिच्या भविष्यासाठी तिला मारहाण करावी लागली तर मागे हटू नका.” असं प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे.
“जेव्हा मुलगी मोठी होते तेव्हा ती अनेकदा स्वतःचा मार्ग निवडू लागते आणि कधीकधी घरातून पळून जाण्याचा प्रयत्नही करते. अशा परिस्थितीत, कुटुंबाने सतर्क राहून मुलगी योग्य मार्गावर राहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. जर तिला पटवून देण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या तर मागे हटू नका.” अशी टिप्पण्णीही ठाकूर यांनी केली आहे.
साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या या विधानावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. “प्रज्ञा ठाकूर यांचे विधान महिलांच्या हक्कांचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अपमान असल्याची प्रतिक्रीया दिली आहे. तसेच, कोणत्याही मुलीला तिच्या पालकांच्या इच्छेविरुद्ध वागण्यापासून रोखण्यासाठी हिंसाचार किंवा धमकी देणे हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आणि नैतिकदृष्ट्या अन्याय्य आहे, असेही अनेक टिकाकारांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, साध्वी प्रज्ञा यांचे समर्थकांनी मात्र त्यांच्या या विधानांचे समर्थन केले आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी ही विधाने पारंपारिक कौटुंबिक मूल्यांचे आणि मूल्यांचे रक्षण कऱण्यासाठी केली आहे.आजच्या काळात, आपली मुले योग्य दिशेने वाढावीत आणि बाहेरच्या प्रभावांना बळी पडू नयेत. ही कुटुंब आणि समाजाची भूमिका आहे.
आपल्या भाषणात प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा पालक तिला लक्ष्मी आणि सरस्वतीचे रूप मानतात, परंतु जेव्हा तीच मुलगी मोठी होते आणि अधर्मी बनण्याचा विचार करते तेव्हा तिला थांबवणे आवश्यक आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी लोकांना सांगितले की, “अशा मुलींवर लक्ष ठेवा. जर त्या परंपरांचे उल्लंघन करून घरातून पळून जाण्याचा विचार करत असतील तर त्यांना रोखण्यासाठी प्रत्येक पाऊल उचला. प्रेमाने, समजवा, अडवा किंवा आवश्यक असल्यास शिक्षा द्या.”
पण राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, ‘साध्वी प्रज्ञा सारख्या वादग्रस्त नेत्यांची विधाने अनेकदा माध्यमे आणि लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि निवडणुकीच्या वातावरणावरही परिणाम करू शकतात. त्यांचे विधान केवळ भोपाळ किंवा मध्य प्रदेशपुरते मर्यादित नाही. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे ते देशभर चर्चेचा विषय बनले आहे.
दुसरीकडे, अनेक महिला हक्क संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या विधानाचा निषेध केला आहे. प्रज्ञा ठाकरू यांचे हे विधान, कोणत्याही प्रकारचा दबाव, धमकी किंवा शारीरिक हिंसाचार वैयक्तिक अधिकारांचे उल्लंघन करणार आहे. पण त्याचवेळी काही लोकांनी कुटुंबाच्या पारंपारिक भूमिकेच्या आणि मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टीने प्रज्ञा ठाकूर यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. पण प्रज्ञा ठाकूर यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा समाजात लव्ह जिहाद आणि कुटुंब नियंत्रणाच्या वादाची ठिणगी पडली आहे. साध्वी प्रज्ञा यांचे विधान निवडणूक आणि सामाजिक चर्चेसाठी एक वादग्रस्त विषय बनले आहे. येत्या काळात त्याचे राजकीय आणि कायदेशीर परिणाम चर्चेत येण्याची शक्यता आहे.