
Hotel owner beats young man in Pune for dropping Rs 10 for biryani
2 जुलैला जागतिक जागतिक बिर्याणी दिन (World Biryani Day) साजरा केला जात आहे. जगभरात कुठेही जा बिर्याणी नाही मिळणार असा देश तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. जगभरात बिर्याणीचे प्रेमी तुम्हाला सापडणारच. भारतात तर खवय्यांचा देश. भारतात बिर्याणी खाणाऱ्यांची कमी नाही. घरी कुठल्या कारक्रमाचे निमित्त असो की बाहेर पार्टी करण्याचं. नॅानव्हेज खाणाऱ्यांना बिर्याणी शिवाय कुठलागी पदार्थ दिसत नाही. या बिर्याणीच्या प्रेमापोटी गेल्या वर्षभरात भारतीयांनी एक- दोन नव्हे तर तब्बल 7.6 कोटी बिर्याणीची ऑर्डर दिली होती अशी माहिती समोर आली आहे. संपूर्ण देशभरातील ग्राहकांनी प्रत्येकी 219 ऑर्डर केल्या आहेत. या ऑर्डरमध्ये ग्राहकांनी चवदार “कोलकाता बिर्याणी” पासून सुगंधित “मलबार बिर्याणी”, “हैदराबादी दम बिर्याणी” पर्यंत ऑर्डर केल्या होत्या. अशी माहिती ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅप स्विगीने (Swiggy) दिली आहे. त्यामुळे भारतात बिर्याणी प्रेमींची किती आहेत या आकडेवारीवरुन दिसून येते.
[read_also content=”अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ! राष्ट्रवादीला केला रामराम https://www.navarashtra.com/latest-news/ajit-pawar-tok-oth-as-news-chief-minister-of-maharashtra-nrps-426257.html”]
भारतीयांच बिर्याणी प्रेम बघता आता हे ही जाणून घ्या या बिर्याणीचा खप वाढवण्यात कोणत्या शहराचा सर्वाधिक वाटा आहे. ज्या शहरांनी सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर केली त्या शहरांमध्ये पहिला क्रमांक बेंगळुरुचा आहे. बेंगळुरूने जवळपास 24,000 बिर्याणी सेवा देणार्या रेस्टॉरंटसह आघाडी घेतली, त्यानंतर 22,000 हून अधिक मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि 20,000 हून अधिक रेस्टॉरंट्ससह दिल्लीने आघाडी घेतली आहे.
या वर्षाच्या जून महिन्यापर्यंत 7.2 दशलक्ष ऑर्डर देऊन बिर्याणीच्या खपामध्ये हैदराबाद अव्वल स्थानावर आहे. बेंगळुरू जवळपास 5 दशलक्ष ऑर्डरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि चेन्नई जवळपास 3 दशलक्ष ऑर्डरसह तिसऱ्या स्थानावर आहे, असे कंपनीने सांगितले आहे.
चेन्नईतील एका बिर्याणीप्रेमीने एका ऑर्डरवर 31,532 रुपये खर्च केले. जवळपास 85 प्रकार आणि 6.2 दशलक्ष ऑर्डर्ससह, ‘दम बिर्याणी’ सर्वांची आवडती बिर्याणी ठरली आहे. तर ‘हैदराबादी बिर्याणी’ला 2.8 दशलक्ष ऑर्डर्स मिळाल्या.
बिर्याणीच्या ऑर्डरमझध्ये यावर्षी 8 टक्के वाढ
ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅप स्विगीने (Swiggy) जानेवारी 2023 ते जून 2023 दरम्यान दिलेल्या ऑर्डरचा डेटा सादर केला. त्यांच्या माहितीनुसार, 2022 च्या तुलनेत मागील साडेपाच महिन्यांत बिर्याणीच्या ऑर्डरमध्ये तब्बल 8.26 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या एका रेकॉर्डनुसार 7.6 कोटींहून अधिक बिर्याणी ऑर्डर्स पूर्ण झाल्या आहेत. या फूड डिलिव्हरी सेवेमध्ये 2.6 लाखांहून अधिक आस्थापना मेनूमध्ये बिर्याणी असल्याच्या यादीत आहेत. देशभरातील 2.6 लाखांहून अधिक रेस्टॉरंट्स स्विगीच्या माध्यमातून बिर्याणी देतात, तर 28,000 हजाराहून अधिक रेस्टॉरंट्स केवळ बिर्याणी बनवण्यात तरबेज आहेत.