Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळी जादू खरोखरच घेत आहे लोकांचे प्राण? याबात NCRB चे आकडे अत्यंत भयानक

2022 मध्ये जादूटोण्यामुळे 85 जणांना जीव गमवावा लागला. तर 2021 मध्ये ही संख्या 68 होती. अहवालानुसार 2013 ते 2022 पर्यंत एकूण 1064 लोकांना जादूटोण्यामुळे जीव गमवावा लागला. जाणून घ्या मानवी बलिदानावरील NCRB आकडेवारी नक्की काय सांगते ते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 05, 2024 | 09:37 AM
काळी जादू खरोखरच घेत आहे लोकांचे प्राण? याबात NCRB चे आकडे अत्यंत भयानक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

काळी जादू खरोखरच घेत आहे लोकांचे प्राण? याबात NCRB चे आकडे अत्यंत भयानक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

काळी जादू फक्त आजच नाही तर शतकानुशतके अस्तित्वात आहे. इतिहासातही अशा अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात ज्यात काळ्या जादूचा उल्लेख आहे. मात्र आजच्या काळात काळ्या जादूमुळे एखाद्याला जीव गमवावा लागला तर ही समाजासाठी चिंतेची बाब आहे. वास्तविक नुकतीच यूपीच्या हाथरसमधून अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये काळ्या जादूमुळे एका 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.  यासोबतच जाणून घ्या देशात काळ्या जादूमुळे किंवा जादूटोण्यामुळे किती लोकांचा जीव जातो.

2022 मध्ये जादूटोण्यामुळे 85 जणांना जीव गमवावा लागला. तर 2021 मध्ये ही संख्या 68 होती. अहवालानुसार 2013 ते 2022 पर्यंत एकूण 1064 लोकांना जादूटोण्यामुळे जीव गमवावा लागला. जाणून घ्या मानवी बलिदानावरील NCRB आकडेवारी नक्की काय सांगते ते.

हे देखील वाचा : इस्रायलच्या तुलनेत भारताचे सैन्य किती शक्तिशाली? जाणून घ्या युद्ध झाले तर कोण जिंकेल

हातरसची घटना

DW ने दिलेल्या वृत्तानुसार सप्टेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील हाथरस येथील डीएल पब्लिक स्कूलमध्ये शाळेच्या व्यवस्थापकाच्या कारमध्ये 11 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. मुलाच्या हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी शाळेचा व्यवस्थापक दिनेश बघेल आणि त्याचे वडील यशोदन यांच्यासह पाच जणांना अटक केली. आता या प्रकरणात असे समोर येत आहे की, शाळेचे व्यवस्थापक वडील यशोदाना हे तांत्रिक कृत्य करायचे आणि त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी आणि कर्जातून मुक्त होण्यासाठी मुलाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला होता.

काळी जादू खरोखरच घेत आहे लोकांचे प्राण? याबात NCRB चे आकडे अत्यंत भयानक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

मानवी बलिदानावरील NCRB आकडेवारी

संपूर्ण देशात अशी किती प्रकरणे आहेत ज्यात जादूटोण्यामुळे मानवांचा बळी दिला गेला. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये देशात एकूण 8 मानवी बळीची प्रकरणे नोंदवली गेली. तर 2014 ते 2022 पर्यंतचे आकडे बघितले तर ही संख्या 111 वर जाते. ही संख्या आहे ज्यामध्ये मानवी बलिदान दिले गेले. पण, अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात जादूटोण्याच्या संशयावरून लोकांची हत्या केली जाते. आता आपण त्या प्रकरणांवर एक नजर टाकूया.

हे देखील वाचा : भारताने का आणला ब्रिटनवर दबाव? आणि मॉरिशसला दिली ‘ही’ बहुमूल्य भेट

अहवालानुसार नरबळींचा आकडा

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये जादूटोण्यामुळे 85 जणांना जीव गमवावा लागला. तर 2021 मध्ये ही संख्या 68 होती. DW च्या अहवालानुसार, 2013 ते 2022 पर्यंत एकूण 1064 लोकांना जादूटोण्यामुळे जीव गमवावा लागला. यातील सर्वाधिक प्रकरणे ही महिलांची आहेत ज्यांना चेटकीण घोषित केल्यानंतर मारण्यात आले. छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि झारखंड यांसारख्या राज्यांमध्ये महिलांना चेटकीण सांगून मारण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत.

 

Web Title: Is black magic really taking peoples lives the figures of ncrb are very scary nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 09:37 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.