तिकीट नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्षांचा थेट राजीनामा
नवी दिल्ली : भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असलेल्या जेडीएसने एका मुद्यांवरून बंडखोरी वृत्ती दाखवली आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजपने काढलेल्या पदयात्रेला जेडीएसने विरोध केला आहे. याबाबत भाजपने विश्वासात घेतले नसल्याचे जेडीएस नेते आणि केंद्रीयमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. त्यामुळे या पदयात्रेला जेडीएसने विरोध केला आहे.
कर्नाटकात भाजपने 3 ते 10 ऑगस्ट दरम्यान काँग्रेस सरकारविरोधात पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती आणि इतर अनेक काँग्रेस नेत्यांना म्हैसूर विकास प्राधिकरणाची जमीन बेकायदेशीरपणे दिली. त्यामुळे याप्रकरणी केंद्र सरकारमधील त्यांचा मित्रपक्ष आणि कर्नाटकातील जेडीएसने उघडपणे विरोध दर्शवला आहे. या मोर्चाला आपला पाठिंबा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याबाबत एच. डी. कुमारस्वामी म्हणाले की, ‘आम्ही या यात्रेला नैतिक पाठिंबा देत नाही. याचे कारण भाजपने यासंदर्भात त्यांच्याशी चर्चाही केली नाही. सध्या केरळमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील जनता चिंतेत आहे. मात्र, त्याची चिंता न करता भाजपने पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला. हे चुकीचे आहे. यामुळेच ते या प्रस्तावाला नैतिकदृष्ट्याही पाठिंबा देत नाही’.
बंगळुरूपासून म्हैसूरपर्यंत जेडीएस मजबूत
तसेच ते पुढे म्हणाले की, ‘बंगलुरूपासून म्हैसूरपर्यंत जेडीएस मजबूत आहे. तेथे यात्रेचे नियोजन करण्यापूर्वी जेडीएसशी बोलणे आवश्यक होते. आमच्यासाठी कर्नाटक आणि कुटुंब हे प्रथम आहे. याचा विचार भाजपनेच करायला हवा होता. त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत नसल्याचे ते म्हणाले.