karnataka election
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Karnataka Exit Poll 2023) येण्यास सुरुवात झाली आहे. कर्नाटकमध्ये(Karnataka News) त्रिशंकू विधानसभेचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे एच.डी. देवेगौडा यांचा जनता दल धर्मनिरपेक्ष किंगमेकर ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे.
न्यूज नेशन-सीजीएस एक्झिट पोल
न्यूज नेशन-सीजीएस एक्झिट पोलनुसार, भाजप 114 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवू शकते. तर, काँग्रेसला 86 आणि जेडीएसला 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. तीन जागा इतर पक्षांच्या किंवा अपक्षांच्या खात्यात जाऊ शकतात.(Karnataka Election 2023)
रिपब्लिक टीव्ही-पी मार्क्यू एक्झिट पोल
रिपब्लिक टीव्ही-पी मार्क्यू एक्झिट पोलनुसार, कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभा होऊ शकते. येथे भाजपला 85-100 जागा मिळतील, तर काँग्रेसला 94-108 जागा मिळतील. जेडीएसला 24-32 जागा मिळू शकतात आणि इतरांना 2-6 जागा मिळू शकतात.
सी वोटरच्या एक्झिट पोल
सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार कर्नाटकच्या सीमावर्ती भागात भाजप काँग्रेसच्या पुढे जाऊ शकतो. या भागात विधानसभेच्या एकूण 21 जागा आहेत. इथे भाजपला 15 ते 19 जागा मिळू शकतात. दुसरीकडे काँग्रेसला 2 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. जेडीएसला इथे काही जागा मिळण्याची शक्यता नाही. वोट शेयरविषयी सांगायचं तर कोस्टल कर्नाटकात भाजपला 49 आणि काँग्रेसला 37 टक्के मतं मिळतील.