Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Almatti Dam: कर्नाटकच्या ‘या’ मागणीमुळे सांगली-कोल्हापूरला महापुराचा धोका वाढला? जाणून घ्या सविस्तर

सांगली-कोल्हापूर शहराला वारंवार महापुराचा फटका बसतो.  2005,2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 19, 2024 | 06:30 PM
Almatti Dam: कर्नाटकच्या 'या' मागणीमुळे सांगली-कोल्हापूरला महापुराचा धोका वाढला? जाणून घ्या सविस्तर

Almatti Dam: कर्नाटकच्या 'या' मागणीमुळे सांगली-कोल्हापूरला महापुराचा धोका वाढला? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra & Karanataka: महाराष्ट्रात पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी महापुराच्या घटना घडतात. त्यातीलच पश्चिम महराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना देखील महापुराचा फटका बसतो. पश्चिम महाराष्ट्रात जी महापूरची स्थिति निर्माण होते त्याला कर्नाटक सरकार जबाबदार असल्याचे म्हटले जाते. म्हणजेच कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरला पुराचा फटका बसतो असे आरोप केले जातात. सध्या या धरणाची ऊंची 519 मीटर इतकी आहे. मात्र आता कर्नाटक सरकारने या धरणाची ऊंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सांगली-कोल्हापूरवर महापूरचे संकट वाढण्याची शक्यता आहे.

अलमट्टी धरणाची ऊंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. धरणाची ऊंची 5 मीटरने वाढवण्यासाठी ही परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यास सांगली-कोल्हापूरला पुराचा धोका वाढणार आहे. मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला की सांगली-कोल्हापूरला पुराचा धोका निर्माण होतो.

सध्या बेळगावमध्ये कानर्तक सरकारचे विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अलमट्टी धरणाची ऊंची वाढवण्यासाठी मागणी केली आहे. त्यासाठी आज बैठकी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सत्ताधारी कॉँग्रेस आणि विरोधात असलेल्या भाजपने देखील या मागणीला पाठिंबा दर्शवला असल्याचे समजते आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे दोन्ही राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र या मागणीमुळे कृष्णा नदीच्या पाण्याचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: कर्नाटक काही ऐकेना! महाराष्ट्र सरकारचा विरोध न जुमानता आता अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय

महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्याच्या स्थापनेपासूनच तिन्ही राज्यांत कृष्ण नदीच्या पाण्यावरून वाद असल्याचे पाहीला मिळाले. हा वाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडून 1969 मध्ये कृष्णा पाणी तंटा लवादाची स्थापन करण्यात आली. ज्यानुसार तिन्ही राज्यांना अनुक्रमे 585 टीएमसी, 731 टीएमसी आणि 811 टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले. पाणी अडवण्यासाठी तिन्ही राज्याना धरणे आणि कालवे बांधण्यासाठी सांगण्यात आले.

कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणाची ऊंची 5 मीटरने वाढवायची आहे. असे करून त्यांना शेती सिंचनाखाली आणायची आहे. त्यासाठी केंद्रीय लवादाने कर्नाटकला धरणाची ऊंची 5 मीटरने वाढवण्यास परवानगी दिली आहे. जर का ही ऊंची वाढवण्याची परवानगी मिळाली तर सांगली कोल्हापूरमध्ये महापुराचा धोका मोठ्या प्रमाणात वधू शकतो.

सांगली-कोल्हापूर शहराला वारंवार महापुराचा फटका बसतो.  2005,2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या महापुराला  यासाठी कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी धरण जबाबदार असल्याचा आरोप होतो. अलमट्टी धरणातून पानी न सोडण्यात आल्याने कृष्णा नदीच्या पाण्याचा फुगवटा वाढून सांगली कोल्हापूरमध्ये पुरस्थिती निर्माण होत असल्याचे महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे. कृष्णा नदी महाराष्ट्रसाठी तसेच सांगली-कोल्हापूरसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र हीच कृष्णा माई अनेकदा कोपल्याचे पाहायला मिळते. कर्नाटक सरकारला धरणाची ऊंची वाढवण्याची परवानगी मिळाली तर या दोन जिल्ह्यांना महापुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र हे रोखणीसाठी आता महाराष्ट्र सरकार कोणती पावले उचलणार हे पहावे लागणार आहे.

Web Title: Karnatak government demand to increase almatti dam height sangli kolhapur flood alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 06:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.