मुंबई – साधारण दोन दशकांपूर्वी भारतीय हवाई दलाने पाहीलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे. इतक्या वर्षांच्या परिश्रमानंतर सोमवारी हवाई दलाला LCH (लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट) मिळणार आहे. विशेष म्हणजे नवरात्रीतील अष्टमीच्या दिवशी ते वायुसेनेच्या ताफ्यात सामील होत असून त्यामुळे लष्कराची ताकद वाढणार आहे.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह जोधपूर एअरबेसवर दाखल झाले आहेत. संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत हे हेलिकॉप्टर जोधपूर एअरबेसवर सामील झाले. दरम्यान, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर हवाई दलाला सुपूर्द करण्यापूर्वी जोधपूर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चारही समाजाचे धर्मगुरूंची उपस्थिती दिसून आली.
कार्यक्रमाला संबोधित करताना राजनाथसिंह म्हणाले की, एलसीएचसाठी (LCH) नवरात्रीपेक्षा चांगला वेळ आणि राजस्थानच्या मातीपेक्षा चांगली जागा असू शकत नाही. वीरांच्या भूमीपासून नवरात्रीतच एलसीएचला सुरूवात झाली, एलसीएचच्या समावेशामुळे हवाई दलाची ताकद वाढेल. सर्व शक्तीचे मोठे सूचक एलसीएच असणार आहे. देशाच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा हा अभिमान असणार आहे. LCH बाबतचा विजय रथ तयार आहे. LCH ने सर्व आव्हाने पेलली आहेत. शत्रूंना सहज टाळता येते.
राजनाथ सिंह या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, आगामी काळात महासत्ता असलेल्या देशांमध्ये भारताचे नाव अव्वल असेल. ते म्हणाले की- प्रकाशत्रूंना सहज टाळता येते. श त्याच्या नावाशी जोडलेला आहे, पण काम त्याचे भारी आहे. सुमारे ३,८८५ कोटी रुपये खर्चून बांधलेले १५ LCH सैन्यात सामील होत आहेत. बेंगळुरूहून तीन एलसीएच जोधपूरला पोहोचले आहेत. उर्वरित ७ हेलिकॉप्टरही येत्या काही दिवसांत येथे पोहोचतील. या स्क्वाड्रनसाठी हवाई दलाच्या १५ वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.