लोकसभा निवडणुकीच्या ( loksabha election 2024) रणधुमाळी आज (1 जून) शेवटच्या टप्प्यात मतदान सुरु आहे. शेवटच्या टप्प्यात देशातील 8 राज्यांमध्ये एकूण 57 जागांवर मतदान सुरु आहे. मतदानाच्या अंतिम टप्प्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोलचे निकाल जाहीर होतील. या एक्झिट पोलवरुन कोणता पक्ष विजयी होईल, याचा अंदाज बांधता येईल. केंद्रात कोणाचे सरकार स्थापन होणार? याची तर सर्वांनाचा उत्सुकता असणार.
अनेकदा एक्झिट पोलचे निकाल आणि मतमोजणीचे निकाल बरेच सारखे असतात. कधीकधी दोन्हीमध्ये मोठा फरक किंवा पूर्ण विरुद्ध असतो. त्यामुळेच अनेकांचा एक्झिट पोलवर पूर्ण विश्वास बसत नाहीये. निवडणुकीच्या रणधुमाळीत केवळ एक्झिट पोलच नव्हे तर ओपिनियन पोलचीही चर्चा होते. शेवटी, ओपिनियन पोलपेक्षा एक्झिट पोल किती वेगळा असतो? दोघांपैकी कोणता अधिक अचूक आहे किंवा या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे ते जाणून घ्या.
एक्झिट पोल म्हणजे काय?
एक्झिट पोल हा एक प्रकारचा निवडणूक सर्वेक्षण आहे. जो मतदानाच्या दिवशी केला जातो. यामध्ये मतदान केल्यानंतर बाहेर पडणाऱ्या मतदारांना विचारले जाते की, त्यांनी कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान केले आहे. अशा प्रकारे मिळालेल्या आकडेवारीचे विश्लेषण करून निवडणुकीचे निकाल काय असतील याचा अंदाज येतो. भारतात, निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी एक्झिट पोलचे निकाल प्रसारित करण्यावर बंदी घातली आहे. मात्र, मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर ही बंदी प्रसारित केली जाऊ शकते. याचा अर्थ लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा सातवा टप्पा संपल्यानंतर काही तासांनी म्हणजे संध्याकाळी 6.30 नंतर एक्झिट पोल जाहीर होऊ शकतो.
ओपिनियन पोल म्हणजे काय?
निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी ओपिनियन पोल जाहीर केला जातो. यामध्ये सर्व लोकांचा समावेश असतो. या सर्वेक्षणात सहभागी होणारे तुमच्या जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश होता. यामध्ये मतदार असण्याची अट बंधनकारक नाही. या सर्वेक्षणात विविध मुद्द्यांच्या आधारे प्रदेशनिहाय मतदारांचा कौल कोणाकडे आहे याा अंदाज लावला जातो. जनतेला कोणती योजना आवडते की नापसंत आहे. जनता कोणत्या राजकीय पक्षांच्या धोरणावर खूश आहे, याचा अंदाज जनमत चाचण्यांवरून येतो.
एक्झिट आणि ओपिनियन पोल मध्ये काय फरक?
मतदानाच्या दिवशी एक्झिट पोल घेतले जातात. मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांना विचारले जाते की त्यांनी कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान दिलेय या आकडेवारीचे विश्लेषण करून निवडणुकीचे निकाल काय असतील याचा अंदाज येतो. निवडणुकीपूर्वी जनमत चाचणी घेतली जाते. यामध्ये सर्व लोकांचा समावेश केला जाऊ शकतो, मग ते मतदार असो वा नसो. यामध्ये सहसा विचारले जाते की लोक कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान करायचे आहेत. एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल हे दोन्ही अतिशय महत्त्वाचे आहेत, पण त्यांनाही काही मर्यादा आहेत. एक्झिट पोल नेहमीच अचूक नसतात, कारण मतदान केल्यानंतर मतदार त्यांचे मत बदलू शकतात. ओपिनियन पोल देखील नेहमीच अचूक नसतात, कारण निवडणुकीपूर्वी मतदार त्यांचे मत बदलू शकतात.