नवी दिल्ली : खासदार निलंबनाच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी संसदेच्या बाहेर आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, संसदेत बोलणार नाही तर कुठे बोलणार. पंतप्रधान मोदी, अमित शहा संसदेच्या बाहेर बोलत असतात. पण, त्यांना संसदेत बोलायला काय अडचण आहे.
लोकांचे प्रश्न उपस्थित करणे आमचा हक्क
संसद चालावं असं सत्ताधाऱ्यांना वाटत नाही. सभापतींनी एक मुद्दा उपस्थित करुन जातीयवादाचे वळण दिलं आहे. आम्ही लोकशाहीमध्ये निवडून आलेले सदस्य आहोत. लोकांचे प्रश्न उपस्थित करणे आमचा हक्क आहे. संसदेच्या सुरक्षाभंगाबाबत आम्हाला काही उत्तरं मिळण्याच अपेक्षा होती. तुम्ही संसदेत बोलणार नाही तर कुठे बोलणार आहात. मोदी-शहा कोणीच संसदेत येऊन बोललं नाही, असं खरगे म्हणाले.
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना विनंती
नियमानुसार मोदी-शहांनी संसदेत बोलणं आवश्यक आहे. पण, ते इतर ठिकाणी बोलत होते. हे दुर्दैवी आहे. आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना विनंती करतो, की त्यांनी आम्हाला बोलू द्यावं. संसदेत अमित शहा यांनी निवेदन द्यावं. सत्ताधाऱ्यांना चर्चाच नकोय. लोकशाहीसाठी हा धोका आहे, असं खरगे म्हणाले.
संसदेबाहेरील आंदोलनात इंडिया आघाडीचे सर्व नेते जमा
भविष्यात पण अशा घटना घडू शकतात. पंतप्रधान मोदी पुढील १०० वर्षांसाठी सत्तेत राहणार नाहीत. त्यामुळे लोकशाहीचं भाजपने पालन करावं. इंडिया आघाडीचे नेते गुरुवारी जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करणार असल्याची माहिती खरगेंनी दिली. संसदेबाहेरील आंदोलनात इंडिया आघाडीचे सर्व नेते जमा झाले आहेत. संसदेतून १४४ खासदारांचं निलंबन झाल्याचा निषेध करण्यात आला.
Web Title: Mallikarjun kharges direct question to modi shah they said mp suspension if not in parliament where will you speak nryb