गुरुग्राम: हरियाणातील गुरुग्राममध्ये (Gurugram) G20 शिखर परिषदेचा कार्यक्रम (G20 Summit) आयोजित करण्यात आला आहे. संमेलनाची शोभा वाढवण्यासाठी बाहेर परिसरात फुलझाडं ठेवण्यात आली होती. ही फुलझाडं चोरण्याचा संतापजनक प्रकार काल समोर आला होता. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. मनमोहन (वय 50) असं व्यक्तीचं नाव असुन त्याच्याकडुन पोलिसांनी एक कार आणि चोरीची फुलझाडं जप्त केली आहेत.
[read_also content=”कंगाल पाकिस्तानची अवस्था इतकी वाईट की सैनिकांचही पोट भरु शकत नाही? त्यांच्या अन्न निधीत केली कपात https://www.navarashtra.com/world/pakistan-is-not-able-to-feed-the-pakistani-army-due-to-economic-crisis-nrps-373254.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील गुरुग्राममध्ये G20 कार्यक्रमासाठी लावलेल्या फुलांची झाडं चोरणाऱ्या दोघांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी याबाबत संताप व्यक्त करत होते. या प्रकरणी कारवाई करत चोरणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. गुरुग्राम मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटीचे जॉइंट सीईओ एसके चहल यांनी सांगितले की, आता आरोपी पकडला गेला आहे, आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल.
#Gurugram this person in 40 lakh vehicle. Whom can be seen flicking out plantations meant for #G20 meeting beautification at Shankar chonk.
A daylight robbery of what? plants! Shame.@gurgaonpolice @DC_Gurugram @cmohry @MunCorpGurugram @OfficialGMDA @TrafficGGM
SOME ACTION PLS. pic.twitter.com/tKfJydLq8S— Raman Malik?? (@ramanmalik) February 27, 2023
हरियाणातील गुरुग्राममध्ये 40 लाखांच्या कारमध्ये येऊन फुलंझाडं चोरल्याची घटना समोर येताच सोशल मिडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत होत्या. अखेर या प्रकरणाची दखल घेत कारवाई करण्यात आली आहे. ही फुलझाडं गुरुग्राममध्ये G20 शिखर परिषदेच्या सुशोभिकरणासाठी आणण्यात आली होती. भाजपचे हरियाणा प्रवक्ते रमण मलिक यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. ज्यामध्ये त्यांनी गुरुग्राम पोलिस आणि प्रशासनाव्यतिरिक्त हरियाणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून कारवाईचे आवाहन केले होते. मलिक यांनी लिहिले – हा व्यक्ती 40 लाखांच्या कारमध्ये आला आणि जी-20 परिषदेसाठी आणलेली रोपे चोरत आहे. हा व्हिडिओ शंकर चौकातील आहे. दिवसाढवळ्या झाडांची चोरी करणे लाजीरवाणे आहे. यावर तात्काळ कारवाई व्हावी.