Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

River Linking Project: देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार; केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील

पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी सर्वतोपरी कामे सुरू आहेत. यास समाजाचाही पाठिंबा आवश्यक आहे. पुढील काळात प्रत्येक घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात येईल. भावी पिढीला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी सर्वांच्याच प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे, असे मतही सी. आर. पाटील यांनी व्यक्त केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 24, 2024 | 02:35 AM
River Linking Project: देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार; केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील

River Linking Project: देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार; केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: देशात अनेक ठिकाणी सातत्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण होते. हजारो नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. देशातील दुष्काळ संपूर्णपणे नाहीसा करण्यासाठी केंद्र सरकारने नदीजोड प्रकल्प हातात घेतला आहे. त्याअंतर्गत देशातील अनेक महत्वाच्या आणि मोठ्या नद्या एकमेकांना जोडून, दुशली भागात त्यांचे पाणी वळवणे असा हा प्रकल्प आहे. दरम्यान आता याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी भाष्य केले आहे.

भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील काही महिन्यांत देशातील २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार, असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती (जलसंसाधन) मंत्री सी. आर. पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केले.

पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे आवश्यक आहे. “हर घर जल’ योजनेमुळे महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली. देशातील महिलांचे दररोजचे साडेपाच कोटी तास वाचले. त्या वेळेचा उपयोग आर्थिक स्वावलंबनासाठी होऊ लागला. शुद्ध पाणी घरी आल्यामुळे जलजन्य आजार कमी होऊन औषधावरील खर्च कमी झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

जलसंधारणाच्या अनेक योजनांना गती मिळते आहे. यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्राधान्य देण्यात आले आहे. जगाच्या १८ टक्के लोकसंख्या भारतात आहे. या तुलनेत स्वच्छ व पिण्यालायक पाणी केवळ ४ टक्के उपलब्ध आहे. भविष्यात देशात पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी, यासाठी नद्या एकमेकांशी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकेल, अशा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नांची गरज

पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी सर्वतोपरी कामे सुरू आहेत. यास समाजाचाही पाठिंबा आवश्यक आहे. पुढील काळात प्रत्येक घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात येईल. भावी पिढीला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी सर्वांच्याच प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे, असे मतही सी. आर. पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Minister c r patil told twenty river will be interconnected under water linking project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 02:35 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.