जेव्हा तुम्हाला एखादा स्थळाचा पत्ता जाणून घ्यायचा असेल तर आपण सगळ्यात आधी गुगलला मॅपच्या मदतीने शोधतो. बरेच लोक त्यांचा स्मार्टफोन (Smarphone) वर असलेलं Google Map आपल्याला जो हवा तो पत्ता अगदी योग्य सांगतो. पण आता Ola कंपनी Google Map ला टक्कर देण्याची तयारी करतेय. ओला कंपनी आपली नेव्हिगेशन सिस्टम लॉन्च करणार आहे. तुम्ही कधी Ola ची स्कूटर वापरली असेल, तर तुम्हाला Google Maps नव्हे तर कंपनीची स्वतःची नेव्हिगेशन प्रणाली मिळते. हे नेव्हिगेशन मॅप माय इंडियाच्या डेटावर अवलंबून असले तरी लवकरच त्याची गरज भासणार नाही. ओला मॅप लवकरच उपलब्ध होईल ओलाने आपली नेव्हिगेशन सिस्टीम पूर्ण तयार करण्याबाबत सांगितले आहे.
[read_also content=”गौतम अदानीच्या ज्याने नाकी नऊ आणले तो हिंडेनबर्गच्या अहवाल म्हणजे नेमकं काय? कपंनीचा मालक कोण, कशाप्रकारे काम करते कंपनी! https://www.navarashtra.com/india/get-to-know-about-hindenburg-reports-chaalenged-to-gautam-adani-networth-nrps-367264.html”]
ओला मॅप्सची झलक दाखवत, कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी एक पोस्ट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये नकाशाचे स्क्रीनव्ह्यू पाहिले जाऊ शकते. त्याने लिहिले, ‘माझ्या ओला मॅप्सची चाचणी करत आहे! ओला अॅप्स आणि आमच्या वाहनांमध्ये ओला नकाशे येत्या काही महिन्यांत येतील.
त्यांनी सांगितले, ‘ज्यांना भारतासाठी त्यांच्या अॅप्समध्ये जागतिक दर्जाचा नकाशा वापरायचा आहे त्यांच्यासाठी आम्ही एक API देखील तयार करत आहोत.’ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ओला मॅप्सची सेवा सध्या ओला इलेक्ट्रिकच्या वेबसाइटवर लाइव्ह आहे. पण लवकरच कंपनी याला इतर प्लॅटफॉर्मवर समाविष्ट करु शकते.
Testing our own Ola maps! Will be live in the Ola app and our vehicles in a couple of months!
Will also be making a dev API for all those who want to use world class maps for India in their apps. pic.twitter.com/L4pchILLfq
— Bhavish Aggarwal (@bhash) January 5, 2023