
२०१५ पासून साजरा केला जातो संविधान दिवस
पंतप्रधान मोदींचे देशवासियांना संबोधून पत्र
देश विकसित भारताच्या दिशेने पुढे जातोय – मोदी
२६ नोव्हेंबर हा दिवस भारताच्या लोकशाही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला आहे. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने जगातील सर्वात मोठे आणि सखोल संविधान औपचारिकरित्या स्वीकारले. या दिवसाला संविधान दिन (Constitution Day) म्हणून ओळखले जाते. दरम्यान संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधून पात्र लिहिले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “माझे प्रिय देशाचे नागरिक. नमस्कार… आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी १९४९ मध्ये संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारले होते. म्हणूनच एनडीए सरकारने २०१५ मध्ये २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्ह्णून साजरा करण्याचा निर्णय घेतला.”
Constitution Day 2025 : भारतीय संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम कोणते? जाणून घ्या त्याची खरी ताकद
पुढे आपल्यात पत्रात पंतप्रधान मोदी म्हणतात, “आपले संविधान एक पवित्र दस्तऐवज आहे. भारतीय संविधानाच्या शक्तीमुळेच माझ्यासारख्या गरीब कुटुंबातून पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवले आहे. संविधानाच्या ताकदीमुळेच मला २४ वर्षे सरकारचा प्रमुख म्हणून काम करता आले. मला आठवतंय मी २०१४ मध्ये जेव्हा पहिल्यांदा संसद भवनात प्रवेश केला होता, तेव्हा मी संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झालो होतो. २०१९ मध्ये मी जेव्हा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश केलेला तेव्हा मी संविधानासमोर मी नतमस्तक झालो होतो.”
संविधान दिवस पर मैंने देशभर के अपने परिवारजनों के नाम एक पत्र लिखा है। इसमें हमारे संविधान की महानता, जीवन में मौलिक कर्तव्यों का महत्त्व और हमें पहली बार मतदाता बनने का उत्सव क्यों मनाना चाहिए, ऐसे कई विषयों पर अपने विचार साझा किए हैं…https://t.co/6SsfdWIUsO — Narendra Modi (@narendramodi) November 26, 2025
भारतीय संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम कोणते?
भारतीय संविधानात असंख्य कलमे आहेत, ज्यांचे महत्त्व आणि उपयोग वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. अनेक कलमे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करतात, तर काही कलमे केंद्र आणि राज्य यांच्यातील सत्तेचे संतुलन राखतात. परंतु या सर्वांमध्ये कलम ३६८ हे एक अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली कलम मानले जाते. कारण हे कलम भारताच्या संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार प्रदान करते. संविधानातील बदल, सुधारणांचे प्रस्ताव किंवा परिस्थितीनुसार आवश्यक बदल करण्यासाठी कलम ३६८ हा मुख्य आधार आहे.
Constitution Day 2025 : भारतीय संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम कोणते? जाणून घ्या त्याची खरी ताकद
तथापि, या कलमाची शक्ती असीमित नाही. १९७३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक केशवानंद भारती प्रकरणात ‘मूलभूत संरचना सिद्धांत’ मांडण्यात आला. या सिद्धांतानुसार, संसदेला संविधान दुरुस्त करण्याचा अधिकार असला तरी ती संविधानाच्या मूलभूत रचनेत बदल करू शकत नाही. म्हणजेच संघराज्यवाद, धर्मनिरपेक्षता, कायद्याचे राज्य, न्यायपूर्ण प्रशासन, न्यायालयीन स्वातंत्र्य इत्यादी मुख्य तत्त्वे बदलली जाऊ शकत नाहीत. हा निर्णय भारतीय लोकशाहीच्या सुरक्षेसाठी एक भक्कम ढाल बनला.