Rahul Gandhi Bangalore:
Rahul Gandhi attack on Election Commission : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणुकांमध्ये झालेल्या मतचोरीच्या आरोपांवर राहुल गांधींनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाले आहेत. कालच्या पत्रकार परिषदेनंतर आज बंगळुरूमध्ये काँग्रेसने वोट अधिकार रॅली आयोजित केली आहे. या रॅलीत राहुल गांधींना पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. “संविधान प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देते, परंतु सध्या देशातील महत्त्वाच्या संस्था कमकुवत केल्या जात आहेत आणि संविधानात हस्तक्षेप केला जात आहे. संविधान गांधी, नेहरू आणि पटेल यांच्या विचारसरणीचे प्रतिबिंब आहे. पण काळ बदलल्यानंतर अशा कृत्यांना शिक्षा होणारच.
राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोग माझ्याकडून प्रतिज्ञापत्र मागत आहे, तर मी संविधानावर हात ठेवून संसदेत शपथ घेतली आहे. आज, जेव्हा देशातील जनता आमच्या मतदारांच्या डेटाबद्दल आयोगाला प्रश्न विचारत आहे, तेव्हा निवडणूक आयोगाने त्यांची वेबसाइट बंद केली आहे. विशेषतः राजस्थान आणि बिहारमध्ये, आयोगाची वेबसाइट जाणूनबुजून बंद करण्यात आली आहे, कारण त्यांना माहित आहे की जर लोक या डेटावर प्रश्न विचारू लागले तर त्यांची खरी परिस्थिती सर्वांना उघड होईल.
अखेर वादावर पडदा, माधुरी कोल्हापूरात परत येणार! राजू शेट्टींनी अंबानी परिवाराचे मानले आभार
ते पुढे म्हणाले की, आमची मागणी आहे की निवडणूक आयोगाने आम्हाला इलेक्ट्रॉनिक मतदार यादी द्यावी. काल मी सिद्ध केले की देशात मतांची चोरी झाली आहे. जर निवडणूक आयोगाने आम्हाला इलेक्ट्रॉनिक मतदार यादी दिली तर आम्ही सिद्ध करू शकतो की भारताच्या पंतप्रधानांनी मते चोरून सत्ता मिळवली आहे.
जर निवडणूक आयोगाने आम्हाला डेटा दिला नाही तर आम्ही हे काम फक्त एका जागीच नाही तर १०, २० किंवा २५ जागांवरही करू शकतो. आमच्याकडे मतदानाची कागदी प्रत उपलब्ध आहे. तुम्ही ही वस्तुस्थिती लपवू शकत नाही. एकच मतदार वारंवार मतदान करत आहे. एक ना एक दिवस तुम्हाला विरोधाला सामोरे जावे लागेल. प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याने हे चांगले समजून घेतले पाहिजे. लोकसभा निवडणूक चोरीला गेली आहे. हा कर्नाटकातील लोकांविरुद्धचा गंभीर गुन्हा आहे. कर्नाटक सरकारने या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करावी. मतदार यादीत १५,००० बनावट नावे समाविष्ट करणाऱ्या आयोगाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत, असंही राहुल गांधींनी यावेळी स्पष्ट केलं.
‘जो सलमानसोबत काम करणार तो मरणार…’, बॉलीवूड दिग्दर्शक आणि निर्मात्यांना मिळाली धमकी; ऑडिओ व्हायरल
राहुल गंघी म्हणाले की तुम्हाला आठवत असेल की कर्नाटक सरकार बेकायदेशीरपणे हटवण्यात आले, पैसे घेऊन सत्ता हिसकावून घेण्यात आली. मी तुम्हाला पूर्ण सत्य सांगतो की लोकसभा निवडणुका देखील फसवणुकीने हिसकावून घेण्यात आल्या. भाजपचा विचार संविधानाविरुद्ध आहे, परंतु काँग्रेसचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता संविधानाचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी नमुद केले.