
Rahul Gandhi PC:
Rahul Gandhi Press Conference News: गेल्या वर्षी देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाही पार पडल्या. पण या निवडणुकांनंतर लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्याने निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप करत आहेत. अशातच काल ( ७ ऑगस्ट) राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन थेट केंद्रीय निवडणूक आयोगावरच गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी कर्नाटक राज्यातील निवडणुका आणि महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांचा संदर्भ देत थेट पुराव्यानिशी गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत निवडणुकीत घोळ झाल्याचा आरोप केला आहे. आतापर्यंत आम्हाला निवडणुकामंध्ये घोळ होत असल्याची शंका होती. पण आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वात चांगली मते मिळाली, जवळपास ४० जागांवर इंडिया आघाडीला विजय मिळाला. पण लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या पाच महिन्यांच्या काळात राज्यातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात नावे जोडण्यात आली. महाराष्ट्रातील लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान करण्यात आले. जवळपास ४० लाख बनावट मते मतदार यादीत जोडण्यात आली, असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी केला.
राहुल गांधी म्हणाले की, “महाराष्ट्रात निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात आल्या महाराष्ट्र निवडणुकीत फसवणूक करून मतदान करण्यात आले. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतदारांची संख्या अचानक वाढली, ही बाब संशयास्पद आहे. प्रत्येक लोकशाहीत सत्ताविरोधी भावना ही नैसर्गिक असते आणि ती प्रत्येक पक्षावर परिणाम करते. मात्र, भाजप हा असा एकमेव पक्ष आहे, जो या भावनांनी प्रभावित होत नाही, हे आश्चर्यकारक आहे.”
राहुल गांधी यांनी हरियाणा, मध्य प्रदेश आणि अन्य निवडणुकांचे उदाहरण देतानाही त्यांनी काही गंभीर दावे केले आहेत. “एक्झिट पोल आणि सर्वेक्षण काहीतरी वेगळे चित्र दाखवत होते पण निकाल मात्र अगदीच भिन्न होता. आम्ही केलेले अंतर्गत सर्वेक्षणातून हे चित्र स्पष्ट दिसत होते. आपल्या लोकशाहीची मुलभूत कल्पना म्हणजे – ‘एक व्यक्ती, एक मत’. मात्र, जर मतदार यादीच चुकीची असेल, बनावट नावे त्यात असतील, तर ही संकल्पनाच धोक्यात येते,” असे राहुल गांधी म्हणाले. तसेच, “लोकांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाला आहे. माध्यमांच्या माध्यमातून एक विशिष्ट वातावरण तयार केले जाते आणि संपूर्ण निवडणूक कार्यक्रम नियोजितपणे रचला जातो, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
कर्नाटक राज्यातील महादेवपुरा विधानसभा मतदार संघातील मतदानात हा घोळ आढळून आला आहे. लोकसभा निवडणुकीत २५ मतदार संघात भाजपने बोगस मतदानाचा घोळ गेला आहे. राहुल गांधी यांनी काही जागांची नावे वाचून दाखवत एकाच जागेवर जवळपास७०-८० मतदारांची नोंद करण्यात आली आहे. अनेक मतदार असेही आहेत जे इतर राज्यातून मतदान करून आले आहेत. ज पहिल्यांदा मतदान करणार आहेत पण त्यांची नोंदणी झाली नसेल पण त्यांना मतदान करायचे असेल तर त्यांना फॉर्म ६ भरून द्यावा लागतो, या फॉर्म ६चा गैरवापर करत अनेकांनीमतदान केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.