Rahul Gandhi Live : 'मत चोरीसाठी नवा प्लॅन...', राहुल गांधींचा डिलिमिटेशनवरून केंद्र सरकारवर निशाणा

डिलिमिटेशन विधेयकावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मतचोरीनंतर लोकशाही संपवण्याचा हा नवा मार्ग असल्याचा आरोप करत त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
Rahul Gandhi Press conference on Delimitation Bill 2026.jpg
राहुल गांधी यांची पत्रकार परिषद (फोटो - एक्स)
Published on: 
Updated on: 
  • राहुल गांधी यांनी घेतली पत्रकार परिषद

  • डिलिमिटेशन बिलावरून राहुल गांधी आक्रमक

  • व्होटचोरी करण्याचा नवा प्लॅन असल्याचा दावा

Rahul Gandhi Press conference : नवी दिल्ली : येत्या ३० नोव्हेंबर रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले असून महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा करणारे संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. डिलिमिटेशन विधेयक मंजूर होण्यासाठी मोदी सरकार पुन्हा एकदा प्रयत्न करणार असल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या विरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत एनडीएवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते व लोसकसभेचे विरोधी पक्षेनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन डिमिलिटेशन बिल हे लोकशाही विरोधी असल्याची भूमिका मांडली आहे. राहुल गांधी म्हणाले, आम्ही व्होटचोरीचा रस्त्याचा खुलासा केला तेव्हा मोदी सरकारने हा नवीन रस्ता शोधून काढला आहे. आमच्या आकडेवारीनुसार, ८० टक्के भारतीय आणि जवळपास १०० टक्के झेन-जी यांचा विश्वास आहे की, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार हे मतदानाची चोरी करतात. हे आम्ही सांगितल्याने, आता ते नवीन प्लॅन घेऊन आले आहेत. हा फक्त एक पळून जाण्याचा मार्ग आहे.

पुढे राहुल गांधी म्हणाले, "भाजपकडून मत चोरण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा हा नवीन मार्ग आहे. निवडणूक आयोगाने स्वतः दिलेल्या माहितीनुसार, २०२४ साली १४० मिलियन लोकांनी केलेले मतदान हे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांच्याच म्हणण्यानुसार, ही २०२४ ची निवडणूक बेकायदेशीर आहे."

पुढे राहुल गांधी म्हणाले, "महिला आरक्षण बिल आधीच मंजूर करण्यात आलं आहे. मग 850 जागा का वाढवायच्या आहेत. हा बदल करण्याचे खरे कारण काय आहे? मतदारसंघावर वार करण्यासाठी आणि स्वतःच्या सोयीचे मतदारसंघ बनवण्यासाठी मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात येत आहे. 850 जागा वाढवणं हा लोकशाहीचा खून आहे. भारताच्या मतदारसंघाचा नकाशा बदलण्याचं काम सुरू आहे."