मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला गुरुवारी कडक सुरक्षेत अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. तत्पूर्वी, अमेरिकेने कॅलिफोर्नियामध्ये राणाला भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. संध्याकाळी ६.२२ वाजता दिल्लीच्या पालम विमानतळावर त्यांचे विमान उतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर एनआयएने त्याला विमानतळावरच अटक केली. अटकेनंतर तहव्वुर राणाला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले.
यावेळी, पटियाला हाऊस कोर्टातही अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. न्यायालयाच्या बंद खोलीत झालेल्या सुनावणीदरम्यान, एनआयएने ईमेलसह सबळ पुरावे दिल्यानंतर कोर्टाने तहव्वुर राणाला १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार म्हणून राणाला अटक करण्यात आली होती. पण मुंबई हल्ल्यानंतर तहव्वूर राणा कुठे गेला. त्याने काय काय केलं, मुंबईवरील हल्ल्यासाठी त्याने काय प्लॅनिंग केलं होतं, याबाबत अनेकांना आजही उत्सुकता आहे. याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे…
अमेरिकेत भीषण हेलिकॉप्टर अपघात; हडसन नदीत कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू, बचावकार्य निष्फळ
दहशतवादी तहव्वुर राणा हा मूळचा पाकिस्तानचा असून कॅनडाचा नागरिक आहे. तो लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी जोडलेला असून मुंबईवरील २६/११ हल्ल्यात त्याची भूमिका असल्याचे मानले जाते. डेव्हिड कोलमन हेडलीने न्यायालयात दिलेल्या साक्षीत म्हटले आहे की राणाने त्याचा पासपोर्ट भारतात आणण्याची व्यवस्था केली आणि त्याला ट्रॅव्हल व इमिग्रेशन कंपनीच्या निमित्ताने भारतात पाठवले, जिथे त्याने हल्ल्यासाठी ठिकाणांची पाहणी केली. भारतीय गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार, राणा या हल्ल्याच्या योजना आखल्या आखणाऱ्यांपैकी एक होता. मुंबईत हल्ला घडवून आणण्यातही त्याने सक्रिय सहभाग घेतला. या हल्ल्याने तो आनंदी झाला होता आणि पाकिस्तानात दहशतवाद्यांना पुरस्कार देण्याची शिफारसही केली होती.
मुंबई हल्ल्याच्या काही दिवस आधी, राणा दुबईमार्गे भारतात आला होता. ११ ते २१ नोव्हेंबर २००८ दरम्यान तो पवईच्या हॉटेल रेनेसान्समध्ये थांबला होता. या काळात त्याने हल्ल्याशी संबंधित जागांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे हल्ल्यांच्या ठिकाणांची रेकी केल्यानंतर तो हल्ल्याच्या म्हणजे, २६ नोव्हेंबरच्या पाच दिवसांआधीच त्याने भारतातून पलायन केले होते.
अमेरिकेतील एफबीआय व अन्य अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे सादर केले, या पुराव्यांनुसार, हा हल्लाचे सर्व प्लॅनिंग हे पाकिस्तानातून झाल्याचे स्पष्ट होते. सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे डेव्हिड हेडलीने २०१० मध्ये दिलेली साक्ष. डेव्हिड हेडलीने लष्कर-ए-तैयबासाठी मुंबईतील ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडंट, नरीमन हाऊस व सीएसटी स्टेशन यांची रेकी केल्याचे मान्य केले होते. तसेच, २००६ ते २००८ दरम्यान त्याने मुंबई अनेक ठिकाणांना रेकी केल्या होत्या, तेथील फोटो आणि व्हिडिओ घेतले, जे नंतर एफबीआयने हस्तगत केले होते. त्याचबरोबर, हेडली, साजिद मीर (लष्कर हँडलर) आणि आयएसआयचे मेजर इक्बाल यांच्यातील फोन व ईमेल व्यवहारांचे रेकॉर्ड्स हल्ल्याचे ठोस पुरावे आहेत.
“तव्वुहर हुसैन राणाला ‘या’ निवडणुकीपर्यंत फाशी नाही…; खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
या ह हेडलीने २००६ ते २००८ दरम्यान पाच वेळा पाकिस्तानात जाऊन लष्करच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतल्याचे पुरावे आहेत. यामध्ये पासपोर्ट तपशील व साक्षीदारांच्या माहितीचा समावेश आहे. राणाने मुंबईला हल्ल्याच्या काही दिवस आधी भेट दिली होती आणि लष्करला सर्व तयारी पूर्ण असल्याची माहिती दिली होती. हेडलीच्या साक्षी व तांत्रिक पुराव्यांवरून स्पष्ट होते की राणाला संपूर्ण कटाची कल्पना होती आणि त्याने लष्करला त्यासाठी मदत केली.
तहव्वुर राणा व डेव्हिड हेडली यांची मैत्री पाकिस्तानातील हसन अब्दल येथील कॅडेट कॉलेजमध्ये झाली होती. ते दोघं जवळपास पाच वर्षे एकत्र शिकले होते. त्याकाळी हेडलीचे नाव दाऊद गिलानी होते. तो नंतर अमेरिकेत स्थायिक झाला आणि नाव बदलून डेव्हिड कोलमन हेडली असे ठेवले. त्याचा जन्म ३० जून १९६० रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथे झाला होता. त्याची आई अमेरिकन आणि वडील पाकिस्तानी होते.
राणाचा जन्म १२ जानेवारी १९६१ रोजी पाकिस्तानातील पंजाब प्रांतात झाला होता. तो नंतर पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर झाला आणि त्याची पत्नीही डॉक्टर होती. १९९७ मध्ये तो कुटुंबासह कॅनडाला गेला आणि तिथे इमिग्रेशन व ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली. काही वर्षांनंतर शिकागोमध्ये राणा व हेडली पुन्हा एकत्र आले. हेडलीने अमेरिकन अधिकाऱ्यांना सांगितले की राणा लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होता आणि त्यानेच त्याला मुंबई हल्ल्याच्या तयारीसाठी भारतात पाठवले होते.
मुंबई हल्ल्यानंतर जवळपास वर्षभराने, ऑक्टोबर २००९ मध्ये, हेडली व राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली. सुरुवातीला त्यांची अटक मुंबई हल्ल्याशी संबंधित नसली तरी, पुढील तपासात त्यांच्या भूमिकेचा उलगडा झाला. हेडली फिलाडेल्फियाला जात असताना एफबीआयने त्याला अटक केली, कारण तो डॅनिश वृत्तपत्रावर हल्ल्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाली होती. या तपासातूनच २६/११ चा कट उघडकीस आला.