नवी दिल्ली : सध्या देशभरात पद्मश्री पुरस्कारासाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र अनेकांनी हा पुरस्कार घेण्यास नकार दिला असल्याचे देखील समोर येत आहे. एकीकडे पद्मश्री पुरस्कार हा देशातील प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये मोडला जातो, तरीही त्याचे फारसे महत्व राहिले नसल्याचे सध्या दिसत आहे. त्यात प्रसिद्ध तबलावादक अनिंदो चटर्जी यांनी देखील हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी याआधी पंडीत रवीशंकर, उस्ताद अमजद अली खान आणि उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबत संगीत मैफील गाजवली आहे. जाहीर झालेल्या पद्मश्रीची माहिती देताना पंडित अनिंदो चॅटर्जी म्हणाले, “मला मंगळवारी (२५ जानेवारी) दिल्लीतून पुरस्कार स्विकारण्याबाबत संमतीसाठी फोन आला. मात्र, मी विनम्रपणे हा पुरस्कार नाकारला आहे. मी या पुरस्कारासाठी धन्यवाद म्हटलं, मात्र करियरच्या या टप्प्यावर मी हा पुरस्कार स्विकारण्यास तयार नसल्याचं कळवलं. हा पुरस्कार स्विकारण्याचा टप्पा मी पार केला आहे.”
पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी याआधी राष्ट्रपती भवनमध्ये देखील तबलावादन केलंय. 1989 मध्ये ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमनमध्ये सादरीकरण करण्याचा मान मिळालेले ते सर्वात तरूण तबलावादक होते. पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी याआधी पंडित रविशंकर, उस्ताद अमजद अली खान आणि उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबत संगीत मैफील गाजवली आहे. पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी दहा वर्षांपूर्वी पुरस्कार मिळाला असता तो स्वीकारला अशता. माझ्या पेक्षा ज्युनिअऱ असणाऱ्यांना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. मी माफी मागतो पण सध्या पुरस्कार स्वीकारु शकत नाही, असं चॅटर्जी यांनी म्हटलं आहे.