Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बचावासाठी गेलेले हेलिकॉप्टर ध्रुवचे अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग, 3 जण बेपत्ता

भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर ध्रुवचे अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या काळात हेलिकॉप्टरमधील भारतीय तटरक्षक दलाचे 4 क्रू सदस्यांपैकी 3 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 03, 2024 | 01:14 PM
बचावासाठी गेलेले हेलिकॉप्टर ध्रुवचे अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग, 3 जण बेपत्ता (फोटो सौजन्य-X )

बचावासाठी गेलेले हेलिकॉप्टर ध्रुवचे अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग, 3 जण बेपत्ता (फोटो सौजन्य-X )

Follow Us
Close
Follow Us:

गुजरातमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर ध्रुवचे अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या काळात हेलिकॉप्टरमधील भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टरमधील 4 क्रू सदस्यांपैकी 3 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एका क्रू मेंबरला वाचवण्यात यश आले आहे, मात्र उर्वरित तीन जण बेपत्ता आहेत.

बचावासाठी गेलेले हेलिकॉप्टर कोसळले

गुजरातमध्ये सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक भागात पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. भारतीय तटरक्षक दलाचेही एक हेलिकॉप्टर गुजरातमध्ये पूर मदत कार्यात गुंतले होते. परंतु काल (2 सप्टेंबर) रात्री पोरंबदर किनाऱ्यापासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्राजवळ हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पायलटला हेलिकॉप्टर पाण्यात उतरवावे लागले. मात्र लॅंडिंगच्या वेळी जोराच ते पाण्यात पडले, त्यामुळे हेलिकॉप्टरमधीस चारही जण पाण्यात बुडाले. यावेळी हेलिकॉप्टरमधील 4 क्रू सदस्यांपैकी 3 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरातमधील पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आणि मदत सामग्री पोहोचवण्यात हे हेलिकॉप्टर व्यस्त होते. या कारवाईत तटरक्षक दलाने 4 जहाजे आणि दोन विमाने तैनात केली आहेत.

On 02 Sep 2024, @IndiaCoastGuard ALH helicopter was launched at 2300 hrs to evacuate an injured crew member from the Motor Tanker Hari Leela off #Porbandar, #Gujarat. The helicopter had to make an emergency hard landing and ditched into sea. One crew member recovered, search for…

— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) September 3, 2024

गुजरातमधील पूर आणि चक्रीवादळात भारतीय तटरक्षक दलाच्या प्रगत लाईट हेलिकॉप्टरने आतापर्यंत ६७ लोकांचे प्राण वाचवले आहेत. तटरक्षक दलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. वैद्यकीय बचावासाठी हेलिकॉप्टर बाहेर आले होते.

इमर्जन्सी लँडिंगनंतर टोही ऑपरेशन केले गेले तेव्हा एका क्रू सदस्याला वाचवण्यात आले. विमानाचे अवशेषही सापडले आहेत, मात्र उर्वरित तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. हेलिकॉप्टर एका जहाजापर्यंत पोहोचत असताना हा अपघात झाला. तटरक्षक दलाने सध्या 4 जहाजे शोध मोहिमेत उतरवली आहेत. इमर्जन्सी लँडिंगचे कारण अद्याप समोर आलेले नाही. प्राथमिक तपासानंतरच तटरक्षक दलाकडून यासंदर्भात निवेदन जारी केले जाऊ शकते.

Web Title: Rescue helicopter dhruv makes emergency landing in the arabian sea 3 missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 01:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.