मुंबई: देशातील मोदी सरकार ईदच्या पवित्र सणानिमित्त मुस्लिम समुदायाच्या सुमारे ४० लाख कुटुंबांना ईदी देत आहे. ईदीच्या निमित्ताने ‘सौगत-ए-मोदी’ किट लोकांच्या घरी पोहोचवले जात आहेत. या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात हिंदू-मुस्लिम संबंधांबाबत अनेक वादविवाद निर्माण झाले आहेत. देशात 2014 नंतर अनेक ठिकाणी जातीय दंगली भडकल्या. लव्ह जिहाद, वोट जिहाद, बटेंगें तो कटेंगे, घरवापसी अशा अनेक मुद्दे उपस्थित केले गेले. या मुद्द्यांकडे लक्ष वेधत संजय राऊत यांनी दैनिक सामनातून मोदी सरकारवर आगपाखड केली आहे.
“भाजपलाही उद्याच्या राजकारणासाठी व्होट जिहादची गरज भासली आहे. बिहारसारख्या राज्यात मुसलमान–यादव मतदार एक झाला तर भाजप आघाडीला आव्हान दिले जाऊ शकते. त्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने बिहारात ‘सौगात’वाटपावर भर दिला. ईदच्या निमित्ताने भाजपने 32 लाख गरीब मुस्लिमांना शिधा, कपडे वगैरे वाटले. त्यात चुकीचे काहीच नाही, पण हे सामाजिक कार्य अन्य एखाद्या राजकीय पक्षाने केले असते तर ‘व्होट जिहाद’ म्हणून बांग मारत ‘हिंदू खतरे में’चे तांडव भाजपातील बाटग्यांनी सुरूच केले असते. आता त्या सर्व बाटग्यांना हिरव्या लुंग्या गुंडाळून मोदींनी मशिदीत ‘सौगात’ वाटायला पाठवले आहे.” अशा शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. तसेच मोदीजी, तुम्हारा जवाब नहीं. अंधभक्तांना असे तोंडावर पाडू नका साहेब! असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
कुणी मेलं आहे का? मजूरांना उडवल्यानंतर आलिशान लॅम्बोर्गिनी चालकाचा माज, Video आला समोर
“पंतप्रधान मोदी यांचे मुसलमान प्रेम अचानक उफाळून आले व त्यांनी ‘ईद’निमित्त 32 लाख मुस्लिमांसाठी ‘सौगात-ए-मोदी’ची घोषणा केली. ईदसाठी ही विशेष सौगात आहे. त्या सौगात किटमध्ये काय आहे? त्यात एक साडी, एक लुंगी, शेवया, साखर वगैरे आहे. रमझानच्या ‘पाक’ महिन्यात भाजपने 32 लाख मुसलमानांच्या घरी जाऊन या सौगातचे वाटप केले. त्यासाठी भाजपने 32 हजार कार्यकर्त्यांवर हे सौगात वाटपाचे काम सोपवले होते. हे भाजपचे कार्यकर्ते मुस्लिमांच्या वस्त्यांत, मशिदीत जाऊन मोदींच्या सौगातचे वाटप करतानाचे चित्र बाटग्या हिंदुत्ववाद्यांना विचलित करणारे होते. ‘सौगात-ए-मोदी’ हे एक राजकीय ढोंग आहे व निवडणुकांसाठी सुरू झालेले मुस्लिमांचे लांगूलचालन आहे.” असा आरोपही त्यांनी केला आहे.
“दिल्लीतही भाजपचे अनेक नेते व मंत्री इफ्तार पार्ट्या झोडत आहेत. आपण निधर्मी असल्याचा देखावा हे लोक निर्माण करीत आहेत. मोदी व त्यांचे लोक देशात टोकाचा धार्मिक द्वेष निर्माण करीत आहेत. मुसलमानांवर हल्ला करण्याची, त्यांना देशद्रोही ठरविण्याची एकही संधी हे लोक सोडत नाहीत.”अशा शब्दांत त्यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.
dream science: नवरात्रीमध्ये स्वप्नात या गोष्टी दिसल्यास तुमच्यावर राहील देवीचा आशीर्वाद
”खरे तर भाजपला सध्या मुसलमान डोळ्यांसमोर नको आहेत, पण भाजपचा मुसलमानांसाठी स्वतंत्र अल्पसंख्यांक विभाग आहे व त्या माध्यमातून ‘सौगात-ए-मोदी’चे वाटप सुरू आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते दिल्लीच्या निजामुद्दीन येथून ‘सौगात’वाटपाची सुरुवात झाली. हेच ते मोदी व नड्डा ज्यांनी लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत ‘वोट जिहाद’ची बांग देऊन हिंदू-मुसलमानांत दुफळी निर्माण केली होती व मुसलमानांपासून सावध रहा असे सांगितले होते. ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’सारखे धार्मिक ध्रुवीकरणाचे नारे प्रचारात आणले.” याकडेही संजय राऊत यांनी लक्ष वेधले.
तसेच, पंतप्रधान मोदी यांची भाषा अत्यंत खालच्या पातळीवरची होती. मुसलमान हे घुसखोर आणि देशद्रोही आहेत. भाजपला मतदान केले नाही तर ते तुमचे घर, जमीन हिसकावून घेतील, तुमचे मंगळसूत्र खेचून पळतील. तुमच्याकडे दोन गाई असतील तर त्यातील एक गाय ते ओढून नेतील. मुसलमान तुम्हाला कंगाल करतील, अशी घृणास्पद भाषा करून मुसलमानांच्या विरोधात डोकी भडकवण्याचे काम मोदी यांनी केले.”अशी टिकाही संजय राऊतांनी यावेळी केली.