नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी (shradhha walkar murder case) रोज नवे नवे खुलासे होत आहेत. याप्रकरणी आता आणखी एक खळबळजनक खुलासा झाला आहे. श्रद्धा वॉकरच्या व्हॉट्सअॅप चॅटवरून तिच्यासोबत झालेला क्रूरपणा उघड झाला आहे. श्रद्धा आणि तिचा माजी टीम लीडर यांच्यातील चॅटमध्ये तीनं म्हण्टलं की, आफताबने मला इतका मारलय की मी उठू शकत नाही. त्यामुळे काम करता येत नाही. श्रद्धा आणि करण भक्की यांच्याशी झालेली ही चॅट 24 नोव्हेंबर 2020 ची आहे. यामध्ये ती बरी नसल्याबद्दल बोलत आहे.
[read_also content=”भाजपने देशात भय, तिरस्कार आणि हिंसा पसरवली, याविरोधात माझी भारत जोडो यात्रा : राहुल https://www.navarashtra.com/india/my-bharat-jodo-yatra-against-bjp-spreading-fear-hatred-and-violence-in-the-country-rahul-346139.html”]
श्रद्धा गप्पांमध्ये चॅटमध्ये म्हण्टलयं की काल झालेल्या भांडणामुळे बहुतेक बीपी कमी झालं असावं.
त्यामुळे शरीर दुखत आहे. अंथरुणावरून उठण्यासाठी शरीरात उर्जा उरलेली नाही. माझ्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आणि कामाच्या नुकसानीबद्दल मी दिलगीर आहे. यासोबतच श्रद्धा आणि तिच्या मैत्रिणीच्या चॅटही समोर आली आहेत. ही चॅट डिसेंबर 2020 ची आहे, जेव्हा आरोपीने तिला मारहाणा केली होती.
या दरम्यान, श्रद्धानं मित्र लक्ष्मणलासुद्ध मारहाणीबद्दल सांगितलं. तिच्या चेहऱ्यावर जखमेच्या अनेक खुणा असलेला फोटोही त्याला पाठवला होता.
दिल्ली पोलिसांच्या तपासात आरोपी आफताब गांजाच्या नशेत असल्याचे समोर आले आहे. गांजा पिण्यावरुन दोघांमध्ये खटके उडक होते. मात्र, आफताब गांजा आणि इतर अमली पदार्थ कोठुन आणायचा, याचा पोलिस तपास करत आहेत.
साकेत न्यायालयाने रोहिणी फॉरेन्सिक सायन्स लॅबला ५ दिवसांत आफताबची नार्को चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच आरोपी आफताबवर थर्ड डिग्रीचा वापर करू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत. वास्तविक, जेव्हा आरोपीची नार्को टेस्ट केली जाते, तेव्हा त्याची संमतीही आवश्यक असते. आफताबला कोर्टात विचारण्यात आले की, तो नार्को टेस्ट करायला तयार आहे का? तेव्हा त्याने होकार दिला.