पाँडिचेरी विद्यापीठातील वार्षित सांस्कृतिक महोत्सवादरम्यान (Pondicherry University Controversy) विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रामयण नाटकावरुन नवा वाद सुरू झाला आहे. सोमयानम नावाच्या नाटकात रामायणातील पात्रांचं विकृत आणि अपमानास्पद चित्रण करण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (ABVP) केला आहे. त्यांनी या नाटकाचा निषेध करत नाटकाच्या दिग्दर्शकासह अन्य जबाबदारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
[read_also content=”भर उन्हाळ्यात पश्चिम बंगालमध्ये वादळाचा कहर, जलपायगुडीमध्ये चार जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी! https://www.navarashtra.com/india/4-people-died-and-more-than-70-injured-in-strom-at-west-bengal-nrps-519431.html”]
पाँडिचेरी विद्यापीठात नुकतचं वार्षित सांस्कृतिक महोत्सवाचं (इझिनी 2K24) आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रामायणावर आधारित नाटकाचं सादरिकरण केलं. यावेळी नाटकात सीतेला रावणाला गोमांस अर्पण करताना दाखवण्यात आले आणि हनुमानजींच्या चरित्राचा विपर्यास करण्यात आला, असा आरोप एबीवीपीने केला. नाटकात अग्निपरीक्षेलाही सीतेच्या अपहरणाचे चुकीचे चित्रण करून अपमानित करण्यात आल्याचंही समोर आलं आहे. यावरुन कॅम्पस परिसरात एकच खळबळ उडाली असुन, एबीवीपीनं या घटनेचा निषेश केला आहे. देवी सीता आणि भगवान हनुमान यांसारख्या हिंदू देवतांचा अपमान करणं कोणत्याही परिस्थितीत माफ करता येणार नाही, असे म्हणत भाजपची विद्यार्थी संघटना ABVP ने नाटकाच्या आशयावर आक्षेप घेतला आहे.
Video from Puducherry University’s cultural fest
In a play, Sita was depicted as dancing with Ravana, being offered beef, & telling him “we can still be friends..”
Some days back, Gayatri Mantra was used as background score for husband beating his wife in a play in GGSIPU pic.twitter.com/7nR29cSkdh
— Subhi Vishwakarma (@subhi_karma) March 31, 2024
पाँडिचेरी विद्यापीठात 29 मार्च ला हा प्रकार घडल्याचं समजतंय. नाटकात रामायणाची खिल्ली उडवली गेली. यामध्ये सीतेला रावणाला गोमांस अर्पण करताना आणि हनुमानजींचे चरित्र विकृत करताना दाखवण्यात आले होते. त्यामुळे सर्व स्तरातुन याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
ABVP ने आपल्या निवेदनात विद्यापीठातील काही गटांनी हिंदू देवतांची बदनामी करण्याचा आणि हिंदू श्रद्धांच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न म्हणून या घटनेचा निषेध केला. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जबाबदार वापर करण्याच्या गरजेवर भर दिला, विशेषत: जेव्हा धार्मिक भावना आणि सांस्कृतिक संवेदनशीलतेचा प्रश्न येतो.
Karyakartas of @ABVPPondicherry University protested against the Department of Performing Arts, Pondicherry University for organising a derogatory play on Prabhu Shri Ram and Mata Sita.
Such actions under the guise of creative liberty are unacceptable. Respect for religious… pic.twitter.com/jLeOVC7TSe
— ABVP (@ABVPVoice) March 31, 2024