नवी दिल्ली : सरकारने देशाच्या ध्वज संहितेत बदल केला आहे. तिरंगा दिवस आणि रात्र उडवण्याची परवानगी दिली आहे. मशीनवर तयार करण्यात आलेले तसेच पॉलिस्टरपासून बनवलेल्या ध्वजाला लावता येणार आहे. ‘आझादी का अमृत महोत्सवा’चा एक भाग म्हणून सरकार 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ या मोहीमेअतंर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत केंद्राने १३ ते १५ ऑगस्ट या काळामध्ये ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ध्वज संहितेमध्ये करण्यात आलेले बदल महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांना याबाबतचे पत्र पाठविले आहे.
[read_also content=”मंकीपॉक्सची जभभरात दहशत, ‘या’ देशात पसरला मंकीपॉक्स https://www.navarashtra.com/india/monkeypox-spread-in-several-country-nrps-307467.html”]
राष्ट्रध्वज वंदनाबाबतचे नियम हे भारताची ‘ध्वज संहिता-२००२’ आणि ‘राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक कायदा-१९७१’ अंतर्गत निश्चित करण्यात आले आहेत. आता २००२ च्या ध्वज संहितेमध्ये बदल करण्यात आले आहेत. याआधी केवळ सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वज फडकाविता येत असे तसेच मशीनवर तयार करण्यात आलेले तसेच पॉलिस्टरचे राष्ट्रध्वजाला परवानगी दिली जात नसे.