Top 10 richest Indian : ‘हे’ आहेत देशातील टॉप १० सर्वात श्रीमंत व्यक्ती; वाचा जानेवारी २०२५ पर्यंतची संपूर्ण यादी
सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. देशात सध्या २१७ अब्जाधीश आहेत ज्यापैकी ८४ जणांची या यादीत नव्याने भर पडली आहे.
Top 10 richest India January 2025 : आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचं वजन गेल्या काही वर्षांपासून वाढत चाललं आहे. भारतातील उद्योजक देशाच्या आर्थिक वाढीसाठी मोठं योगदान देत असून २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. देशात सध्या २१७ अब्जाधीश आहेत ज्यापैकी ८४ जणांची या यादीत नव्याने भर पडली आहे.
Henley & Partners च्या गेल्या वर्षीच्या रिपोर्टनुसार, २०२४ मध्ये जगातील टॉप ५० श्रीमंत शहरांमध्ये मुंबई आणि दिल्ली अनुक्रमे २४ व्या आणि ३७ व्या स्थानावर होते. यातूनच हे भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या वाढती संख्या पुन्हा एकदा अधोरेखीत होते.विशेष म्हणजे भारताची आर्थिक राजधानी मुंबईने बिजींगला मागे टाकत बिलीनियर्स कॅपिटल ऑफ अशियाचा मान पटकावला आहे. यासह मुंबई सर्वात वेगाने वाढत असलेलं ‘बिलेनियर्स हब’ ठरत आहे. याबरोबरच हुरुन(Hurun) च्या रिपोर्टनुसार मुंबई जगातील तिसरे सर्वात श्रीमंत शहर बनले आहे.
२०१४ मध्ये, भारतातील १०० अब्जाधीशांची एकूण संपत्ती गेल्या वर्षीच्या शेअर बाजारातील तेजीमुळे ३००अब्ज डॉलरहून अधिकने वाढून १.१ ट्रिलियन डॉलरवर पोहचली. यातच आता नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच फोर्ब्सने जानेवारी २०२५ पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जारी केली आहे. या यादीतील भारतीयांची नावे आज आपण पाहाणार आहोत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे यादीतील पहिले भारतीय ठरले आहेत. तर जागतिक क्रमवारीत त्यांचा १८ वा क्रमांक लागतो. नुकत्याच आलेल्या आर्थिक अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी उत्पन्नाच्या बाबतीत भारतातील सर्वाधिक नफा कमवणारी कंपनी ठरली आहे.
तर भारतीय महिला अब्जाधीशांच्या यादीत सावित्री जिंदाल आणि फॅमिली यांचा देशातील सर्वात श्रीमंत महिला असल्याचे जाहीर करण्यातआले आहे. त्यांची संपत्ती ३८.५ अब्ज डॉलर इतकी आहे. तर डी मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमाणी हे ३१.५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह २०२५ मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक ठरले आहेत. संपत्तीचा आकडा ०२ जानेवारी २०२५ पर्यंतचा आहे.
फोर्ब्स अब्जाधीशांच्या ताज्या यादीनुसार, २०२५ मधील टॉप १० श्रीमंत भारतीय आणि त्यांची जागतिक क्रमवारी
मुकेश अंबानी ९५.४ अब्ज डॉलर
गौतम अदानी ६२.३ अब्ज डॉलर
शिव नाडर ४२.१ अब्ज डॉलर
सावित्री जिंदाल आणि फॅमिली ३८.५ अब्ज डॉलर
दिलीप संघवी २९.८ अब्ज डॉलर
सायरस पूनावाला २२.२ अब्ज डॉलर
कुमार बिर्ला २१.४ अब्ज डॉलर
कुशल पाल सिंग १८.१ अब्ज डॉलर
रवी जयपुरिया १७.९ अब्ज डॉलर
राधाकिशन दमाणी १५.८ अब्ज डॉलर
Web Title: Top 10 richest india in january 2025 mukesh ambani to radhakishan damani check list