Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुतुबमिनारपेक्षा ५ पट लांब झोजिला बोगदा; आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण

आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा साकारण्यात येत आहे. भारतातील जम्मू काश्मीरमध्ये या बोगद्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे लडाखचा उर्वरीत भारताशी संपर्क तुटू नये म्हणून हा बोगदा महत्वाचा ठरणार आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 31, 2025 | 02:45 PM
कुतुबमिनारपेक्षा ५ पट लांब झोजिला बोगदा; आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण

कुतुबमिनारपेक्षा ५ पट लांब झोजिला बोगदा; आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील जम्मू आणि काश्मीरमध्ये झोजिला बोगद्याचे काम सुरू आहे. हा बोगदा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा बोगदा असणार आहे. याची लांबी सुमारे १३ किलोमीटर इतकी असणार आहे. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे लडाखचा उर्वरीत भारताशी संपर्क तुटू नये म्हणून हा बोगदा महत्वाचा ठरणार आहे. सध्या या बोगद्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. शून्याखाली तापमान येणाऱ्या भागात हा बोगदा उभारला जात आहे.

Sanjay Raut News: लव्ह जिहाद, वोट जिहाद, बटेंगें तो कटेंगे…; सौगत-ए-मोदी’ वरून संजय राऊतांनी मोदी सरकारला थेट आरसाच दाखवला

हिवाळ्यातही लडाखशी संपर्क तुटणार नाही

लडाख, जम्मू आणि काश्मीर येथे हिवाळ्यात बर्फवृष्टी होत असते. बर्फ वृष्टीमुळे अनेकदा या भागाचा उर्वरीत देशाशी संपर्क तुटतो. त्यामुळेच लडाखला देशाच्या इतर भागांशी सर्व ऋतूंमध्ये जोडणारा हा महत्वाचा प्रकल्प आहे. या बोगद्याचा खर्च १२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त अपेक्षित होता, मात्र तो आता केवळ ५५०० कोटी रुपयांमध्ये पूर्ण केला जाणार आहे.

अशी असणार चोख सुरक्षा व्यवस्था

कुतुबमिनारपेक्षा ५ पट लांब झोजिला बोगदा; आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण

७५० मीटर कालीन अंतरावर असतील रस्त्याच्या दोन्ही बाजूला. कॅरेजवेच्या दोन्ही बाजूला पदपथ देखील असतील
१२५ मीटर अंतरावर कॉल करण्याची सुविधा युरोपियन मानकांनुसार बोगद्याच्या आत
ऑटोमॅटिक फायर डिटेक्शन सिस्टम आणि मॅन्युअल फायर अलार्मसाठी बटण आणि सीसीटीव्ही कॅमेरे

ऑस्ट्रियन तंत्रज्ञानाचा वापर

हा प्रकल्प स्मार्ट बोगदा प्रणालीसह सुसज्ज असून, नवीन ऑस्ट्रियन बोगदा खोदण्याच्या वीजपुरवठा आणि व्हेंटिलेशन यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या प्रकल्पात भारत सरकारच्या ५००० कोटींची बचत झाली आहे.

३ तासांचा प्रवास २० मिनिटात होणार

गडकरी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही या अत्याधुनिक प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आमंत्रित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये या बोगद्याची पायाभरणी केली होती. ७.५७ मीटर उंचीचा हा घोड्याच्या नालाच्या आकाराचा, दोन-लेन असलेला सिंगल-ट्यूब बोगदा आहे. तो हिमालयात झोजिला खिंडीखाली काश्मीरमधील गांदरबल आणि लडाखमधील द्रास (कारगील) जिल्ह्याला जोडेल. सध्या झोजिला खिंड पार करण्यासाठी सुमारे तीन तास लागतात, मात्र हा बोगदा पूर्ण झाल्यावर प्रवासाचा वेळ फक्त २० मिनिटांवर येईल. गडकरी म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन लाख कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू आहेत. तसेच १०५ बोगद्यांचे बांधकाम सुरू आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

कुणी मेलं आहे का? मजूरांना उडवल्यानंतर आलिशान लॅम्बोर्गिनी चालकाचा माज, Video आला समोर

Web Title: Zojila tunnel five times longer than qutub minar 70 percent work completed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 02:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.