ऑनलाईन फूड ऑर्डर सर्विस (Online Food Service) आज आपल्या आयुष्यात महत्त्वाचा भाग आहे. अनेक जण आता बाहेरुन जेवण ऑर्डर करतात. रात्री उशीरापर्यंत त्यांची सर्विस सुरू असल्यामुळे लोकं मोठ्या प्रमाणार जेवण ऑर्डर करतात. तुम्ही म्हणालं यात काय नवीन आहे. जेवण ऑर्डर करणं काही चर्चेचा विषय नाही आहे तर, या दरम्यान ग्राहक आणि तर फूड डिलिव्हरी बॅायमध्ये झालेलं संभाषण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण या दरम्यान डिलिव्हरी बॅायने असंकाही म्हण्टलं की ते ऐकूण तुम्हीही आश्चर्य व्यक्त करणार. नेमका काय आहे हा प्रकार पाहुया.
[read_also content=”नोकराने नोकरी सोडल्याचा राग मालकाला अनावर, अमानुष मारहाण केली, बोटाची नखे काढली, कुत्रा अंगावर सोडला, नोकराचा मृत्यू! https://www.navarashtra.com/latest-news/servant-died-after-beaten-up-by-owner-after-he-refuse-to-come-back-at-work-nrps-457033.html”]
ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवेमध्ये जेवण ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या डिलिव्हरी बॉयशी (Zomato Delivery Boy) बोलण्याचा पर्याय असतो. एका महिलेने झोमॅटो वरून ऑनलाईन फूड ऑर्डर केले. या दरम्यान त्या दोघांमध्ये झालेलं संभाषण सध्या व्हायरल होत आहे. या व्यक्तीने महिलेला विचारलं की, ‘तुम्हाला गांजासारखे दुसरे काही हवे आहे का?’ ग्राहकाच्या रूममेटने या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे वाचून इंटरनेट युझर्स वेगवेगळे कंमेट करत आहेत.
हे ट्विट व्हायरल झाले आहे, लोकांकडून मजेदार प्रतिक्रियांचा पूर आला आहे, काही लोक डिलिव्हरी एजंट किती काळजी घेतात हे म्हणत आहेत. तिसरा म्हणाला, “प्रत्येकाला असे डिलिव्हरी बॅाय मिळू दे.” चौथा म्हणाला, “पहाटे 2 वाजता ऑर्डर करणार तर तुम्हालाही असेच उत्तर मिळणार.”