150 corona positive thousands quarantined in Delhi for Republic Day parade
दिल्ली : प्रजासत्ताक दिन (Republic Day) आणि आर्मी डे परे़डसाठी (parade) दिल्लीत जवान तैनात केले आहेत. या जवानांतील १५० जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिल्लीत आलेल्या सर्व जवानांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणी घेण्यात आली होती. परंतु त्यातील १५० जवानांचे कोरोना अहवाल सकारात्मक आढळले आहेत.
दिल्लीत प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये कोरोनाच्या दृष्टीने चोख दक्षता घेतली आहे. परेडमध्ये भाग घेण्यासाठी हजारो जवान दिल्लीत दाखल झाले आहेत. यातील जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हजारो जवानांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे.
[read_also content=”जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, खबरदारीसाठी इंटरनेट सेवा बंद https://www.navarashtra.com/latest-news/two-terrorist-killed-in-jammu-and-kashmir-nraj-69780.html”]
२६ जानेवारीला साजरा होणारा प्रजासत्ताक दिन तसेच १५ जानेवारी आर्मी डे परेडमध्ये भाग घेण्यासाठी हजारो सैनिक दरवर्षी दिल्लीत येतात. कोरोना महामारीचा धोका अजूनही संपलेला नाही. हे लक्षात घेता परेड सुरक्षितपणे आयोजित करण्यासाठी प्रोटोकॉल ठरविण्यात आले आहेत. राजपथ येथे २६ जानेवारीला परेड आयोजित करण्याची योजना आहे. जासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱया सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आमंत्रित केले आहे.