किराणा खरेदी-विक्री किंवा फूड डिलिव्हरी किंवा चहाची टपरी असो अनेकजण डिजीटल पेमेंटला पसंती देतात. या ऑनलाइन व्यवहारांमध्ये गुगल पे चा मोठा वाटा आहे. कोट्यावधी नागरिक गुगल पे अॅपचा सार्वधिक वापर करतात. एका अहवालानुसार भारतात डिजीटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच गुगस पे आणि इतर डिजीटल कंपन्यांचे महत्त्व वाढले आहेत. पण असं असतानाच एका देशात मात्र गुगल पे बंद होणार आहे. कोणता तो देश आणि का होतंय त्या देशात गुगल पे बंद होणार ते जाणून घ्या…
या देशात होणार गुगल पे बंद
ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्ममधील गुगल पे हे अॅप अमेरिकेत बंद होणार आहे. याबाबत Google Pay ने घोषणा केली असून हे ॲप ४ जून पासून अमेरिकेत बंद होणार आहे. ४ जून २०२४ नंतर यूएसमध्ये Google Pay वापरू शकणार नाही. मात्र, असा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण गुगल पे हे लोकप्रिय पेमेंट ॲप आहे. जर आपण भारताबद्दल बोललो तर ते Google वर दुसरे सर्वात लोकप्रिय पेमेंट ॲप आहे. गुगल पे ही अमेरिकन कंपनी आहे, जी स्वतःच्या देशात गुगल पे बंद करत आहे? या मागाचं कारण काय?
Google Pay ॲप का बंद होत आहे?
अमेरिकेत Google Pay ॲप बंद करण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीला Google Wallet चा प्रचार करायचा आहे. तसेच, कंपनीला आपल्या युजर्ससाठी ऑनलाइन पेमेंट सुलभ करायचे आहे. याच कारणामुळे गुगल पे ॲप बंद करत आहे. पण भारताच्या बाबतीत गुगलला असा धोका पत्करायचा नाही, कारण भारत ही गुगल पेसाठी मोठी बाजारपेठ आहे. तसेच Google Pay हा दुसरा सर्वात मोठा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे.
भारतात गुगल पे बंद होणार का?
भारतात GPay म्हणजेच Google pay ची सेवा सुरु राहणार आहे. Gpay युजर्सला काळज करण्याची गरज नाही. तसेच गुगल पे ची सेवा भारतात यापूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहे. इतकेच नाही तर सिंगापूर येथे सुद्धा गुगल पे सुरु असणार आहे. तुम्ही जर गुगल पे चा वापर आर्थिक व्यवहारांसाठी करत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.