4 killed, 6 injured in steel plant leak, Toxic gas leaks at steel plant nrsj
ओडीशा : राउरकेला स्टील प्लान्टच्या कोल केमिकल डिपार्टमेंटमध्ये बुधवारी सकाळी साडे नऊच्या दरम्यान विषारी वायु गळती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अचानक कंपनीतील कोल डिपार्टमेंटमध्ये अचानक वायू गळती होऊ लागली.
कंपनीत वायू गळती झाल्यावर सतर्क कर्मचाऱ्यांनी कंपनीबाहेर पडण्यासाठी धावाधाव केली. मात्र आफरातफरीत अनेकजण विषारी वायूच्या संपर्कात आले. त्यामुळे ४ जणांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले आहेत.
Odisha: Four people dead, six people fall ill due to toxic gas leakage from a unit at Rourkela Steel Plant pic.twitter.com/TkRNSwsMOK
— ANI (@ANI) January 6, 2021
विषारी वायूच्या संपर्कात आल्याने अनेकांची प्रकृती बिघडली आहे. काहींची प्रकृती गंभीर आहे. उपचारासाठी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.