फळांचा समावेश केल्यास तुमच्या शरीरातील रक्तातील कमतरता भरून काढण्यास वेळ मिळतो आणि तुम्हाला निरोगी राहण्यास मदत मिळते. (फोटो सौजन्य - iStock)
डाळिंबात विटामिन सी, विटामिन ए आणि लोह यांसारखे पोषक घटक आढळतात. यासोबतच डाळिंब शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यात खूप मदत करते. दररोज सकाळी एक डाळिंब खाल्ल्यास ३० दिवसात योग्य परिणाम दिसतो. (फोटो सौजन्य - iStock)
12 महिने बाजारात सहज उपलब्ध असलेले सफरचंद हे फळ शरीरातील रक्त वाढवण्यासाठी खूप चांगले ठरतेृ. रोज सकाळी नाश्त्यापूर्वी सफरचंद त्याच्या सालीसह खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य - iStock)
शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी द्राक्षे खाणे खूप फायदेशीर मानले जाते. शरीरात रक्त निर्माण करण्यासोबतच द्राक्षे शरीरातील कमजोरीही दूर करतात.(फोटो सौजन्य - iStock)
शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण केळं वाढवते. केळ्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते.(फोटो सौजन्य - iStock)
संत्र्यामुळे विटामिन सी मिळते, जे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करते. तसेच ते खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते.(फोटो सौजन्य - iStock)