kumbhmela haridwar
उत्तराखंडमध्ये एप्रिलमध्ये कुंभमेळ्याचं(Kumbh Mela) आयोजन करण्यात आलं होतं. महिनाभर हा कुंभमेळा सुरु होता.लाखो लोकांनी या कुंभमेळ्यामध्ये भाग घेतला होता. मात्र या कुंभमेळ्यानंतर कोरोना रुग्णांच्या(Corona Spread in Kumbh Mela) संख्येत झपाट्याने वाढ झाली. कुंभमेळ्याला उपस्थित राहिलेल्या भाविकांकडून कोरोनाचा प्रसार झाल्याचे समोर आले.
[read_also content=”अक्षय तृतीयेला का केले जाते दान ? शुभ मुहूर्त कोणता ? अधिक माहिती जाणून घ्या एका क्लिकवर https://www.navarashtra.com/latest-news/what-is-the-importance-of-akshaya-tritiya-nrsr-128252.html”]
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कुंभमेळ्याला भेट दिलेल्या एका कोरोनाबाधित ६७ वर्षीय महिलेमुळे बंगळुरुमध्ये आणखी ३३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पश्चिम बंगळुरुमधील स्पंदना हेल्थकेअर आणि रिहॅबिलिटेशन सेंटरमधील १३ रुग्णांचाही यामध्ये समावेश आहे. उपचारानंतर सर्व जण बरे झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कुंभमेळ्यावरुन परतल्यानंतर महिलेने कोविड चाचणी केली होती. ती पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर तिच्या पतीची आणि सुनेची चाचणी देखील पॉझिटिव्ह आली होती. स्पंदाना हेल्थकेअरमध्ये मानसोपचार तज्ज्ञ असणाऱ्या वृद्ध महिलेच्या सूनेला देखील कोरोनाची लागण झाली होती. सुनेची चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी कोणतीही लक्षणे नसल्याचे तिने सांगितले.
यानंतर बीबीएमपी येथील अधिकाऱ्यांनी हे प्रकरण आपल्या हातात घेतले आणि कॉन्टॅक्ट ट्रेसीिग करण्यास सुरूवात केली. स्पंदना हॉस्पिटलमधील त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात आली. यामध्ये रुग्णालयातील १३ रुग्णांसह २ कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले. तसेच कुंभमेळ्याहून परतलेल्या कुटुंबातील १८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान सर्वांवर उपचार करण्यात येत असून काही जण बरे झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
स्पंदाना रुग्णालयातील १५ जण करोनाबाधित आढळल्याने रुग्णालयाचा एक मजला बंद करावा लागला आणि त्याला कोविड केअर वॉर्ड घोषित करावे लागले अशी माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. महेश आर गौडा यांनी दिली. रुग्णालयातच कोरोनाबाधितांवर उपचार केल्याचे त्यांनी सांगितले. सर्व बाधितांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.