
ventilator bed
कल्याण : कोरोना रुग्णाला व्हेंटिलेटरची(ventilator) गरज भासल्यास पालिकेची आरोग्य यंत्रणा अशा रुग्णांसाठी प्रयत्न करत असते. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल कोरोना रुग्णालयातील १५ पैकी ७ व्हेंटिलेटर बंद(7 ventilators are off in covid care hospital) असल्याचे भाजपाच्या निदर्शनात आले.
चार दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या रुग्णालयात जाऊन तेथील आरोग्य यंत्रणेबाबत माहिती घेतली असता येथील काही व्हेंटिलेटर बंद असल्याचे निदर्शनात आले.रुग्णांना वेळेवर व्हेंटिलेटर मिळणे आवश्यक असताना गेल्या ८ दिवसांपासून रुग्णालयातील १५ पैकी ७ व्हेंटिलेटर बंद असतील ते हा आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.भाजपच्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी या रुग्णालयात जाऊन विचारला.
[read_also content=”सोने -चांदीच्या दरात झाली घसरण, जाणून घ्या काय आहे आजची किंमत https://www.navarashtra.com/latest-news/gold-and-silver-prize-is-down-know-what-is-todays-prize-nrsr-122264.html”]
भाजप डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी,माजी नगरसेवक निलेश म्हात्रे,राजन आभाळे,मुकुंद ( विशू ) पेडणेकर आणि सुरेश सोनी यांनी डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल कोरोना रुग्णालयात येथील व्यवस्थापकांची भेट घेतली.
या रुग्णालयात १५ पैकी ७ व्हेंटिलेटर हे गेल्या आठ दिवसांपासून बंद आहेत. कोरोनाच्या या संकटात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ७ व्हेंटिलेटर बंद असणे हे बरोबर नाही. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे होते.७ व्हेंटिलेटर बंद झाले ते समजताच नव्याने लवकरात व्हेंटिलेटर लावणे आवश्यक होते असे भाजपच्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचे म्हणणे होते.
माजी नगरसेवक निलेश म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी पालिकेच्या डोंबिवली येथील जिमखाना कोरोना रुग्णालयात एका रुग्णाला बेड साठी तब्बल चार तास रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिकेत ऑक्सिजन लावून वाट पाहावी लाग्ल्याबाबतचा जाब विचारला होता.तर रुग्णालयाचे व्यवस्थापक राहुल घुले यांना विचारले असता त्यांनी रुग्णालयातील सात व्हेंटिलेटर बंद असून आठ सुरु आहेत. पालिका प्रशासनाकडून हे व्हेंटिलेटर दुरुस्तीसाठी धाडत नव्याने सहा व्हेंटिलेटर मागविण्यात आले आहे.हे व्हेंटिलेटर जोडण्यासाठी चार ते पाच दिवसांचा अवधी लागणार आहे असल्याचे सांगितले.
दरम्यान पालिका प्रशासन कोरोना संकटात रुग्णांसाठी दिवसरात्र आरोग्य सेवा देत असली तरी पालिकेच्या कोरोना रुग्णालयात व्हेंटिलेटर बंद आहेत का चालू आहेत याची वेळेवर माहिती घेणे आवश्यक आहे,असे नागरिकांचे म्हणणे आहे.