
नेटवर्क, सोशल मीडिया (media) अर्थात व्हॉटस्ॲप (whatsapp) , फेसबुक
(facebook), इन्स्टाग्रामसह (instagram) इतर सोशल मीडियामुळे नवरा बायकोमधील संवाद दुरावत चालला असून, अनेकांचे वैवाहिक आयुष्य मोबाईलमुळे उद्ध्वस्त होत आहे. गत सहा महिन्यांत भरोसा सेलकडे पती पत्नीमध्ये वाद झाल्याच्या तब्बल १३०५ तक्रारी आल्या असून, यामध्ये ८० टक्के तक्रारी मोबाईलमुळे वाद झाल्याच्या आहेत. अहमदनगर पोलिसांच्या भरोसा सेलच्या आकडेवारीवरून ८० टक्के सुखी संसारात विष कालविण्याचे काम मोबाईल करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या (social media) नवरा-बायकोच्या (wife) नात्यामधील गोष्ट घटस्फोटापर्यंत जाऊन पोहचली आहे.
नवरा-बायकोमधील बहुताशं वादाला मोबाईल हेच कारण बनले आहे. अनके तक्रारींमध्ये सतत फोनवर बोलणे, सोशल मीडियावर जास्त वेळ घालविणे. या सर्व कारणांमुळे वाद होत आहेत. यापूर्वी हुंडा, घरगुती हिंसाचार, दारुडा पती, अनैतिक संबंध ही कारणे घटस्फोटासाठी दिली जात होती.
हायटेक युगात आणि बहुतांश जोडपी उच्चशिक्षित असतानासुध्दा सोशल मीडियासारखे कारण घटस्फोटासाठी (divorce) कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवरा-बायकोमध्ये होणार वाद जणू ‘कहानी घर घर की’ सारखेच झाले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
९९५ प्रकरणांत समुपदेशन
भरोसा सेलकडे गत सहा महिन्यात पती-पत्नींच्य तक्रारींचा ओघच सुरू आहे. चालू वर्षात आतापर्यंत १३०५ तक्रारी आल्या आहेत.त्यामध्ये ९९५ तक्रारी भरोसा सेलच्या समुपदेशन केंद्राने समुपदेशनाद्वारे सोडविल्या आहेत. तसेच,३३० प्रकरणात चौकशी सुरु आहे.
भरोसा (trust)सेलकडे पती-पत्नीमधील वादाची तक्रार आल्यानंतर समुपदेशाद्वारे तक्रार निकाली काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, काही प्रकरणात समुपदेशन करून सुद्धा मार्ग निघत नसल्याने, शेवटी गुन्हा दाखल होता.
तक्रार कशा प्रकारे दाखल केली जाते यांचा थोडक्यात आढावा, एखाद्या स्त्रीच्या पतीने किंवा पतीच्या नातेवाईकाने तिला क्रूर वागणूक वा केल्यास भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल होतो.वर्षांचा कारावास व दंड अशा शिक्षेचे प्रावधान अजामिनपात्र असल्याने पोलिसाकडून पुढील कारवाई केली जाते. मोबाईलवरून (mobile) झालेल्या वादाच्या शेकडो तक्रारी दाखल आहेत. या तक्रारीवर संबंधिताना एकत्रितपणे बोलावून घेत. समुपदेशन करीत पुन्हा संसार जुळविण्यासाठी भरोसा सेलकडून प्रयत्न सुरू आहेत.
तक्रारींचे स्वरूप