Tokyo Olympics मध्ये माधुरी दीक्षितच्या 'या' गाण्यावर इस्त्रायलच्या जलतरणपटूंचा भन्नाट डान्स ; पाहा Video

एडन ब्लेचर आणि शॅली बोब्रिट्स्की या इस्त्रालयलच्या महिला जलतरणपटूंनी ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. टोक्यो अ‍ॅक्वेटिक्स सेंटरमध्ये झालेल्या या फेरीमध्ये सादरीकरण करताना त्यांनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली.
fafff18b03ab3526f983b6b36dbb9d2184d0a9225e26221b5c353acf31b5829b
Published on: 
Updated on: 

टोकियो: यंदाच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत काही स्पर्धकांवर बॉलिवूडची भुरळ पाहायला मिळाली, मगंळवारी टीम इस्रायलच्या इडन ब्लेचर आणि शेलि बोब्रित्स्की यांच्या जोडीने कलात्मक जलतरण दुहेरी फेरीत माधुरी दीक्षितच्या 'आजा नच ले' या गाजलेल्या गाण्यावर जलतरण नृत्य सादर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या या दोघींच्या या खास परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर अनेक भारतीयांनी देखील ऑलिम्पिकला बॉलिवूडचा तडका दिल्याने या इस्रायली जोडीचं कौतुक केलंय.

एडन ब्लेचर आणि शॅली बोब्रिट्स्की या इस्त्रालयलच्या महिला जलतरणपटूंनी ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. टोक्यो अ‍ॅक्वेटिक्स सेंटरमध्ये झालेल्या या फेरीमध्ये सादरीकरण करताना त्यांनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली. पण अंतिम फेरी गाठण्यात मात्र त्यांना यश मिळू शकलं नाही.